Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा; म्हणाले,'भाजपकडून माझंही घर फोडण्याचा प्रयत्न, मुलाला पक्षप्रवेशाची ऑफर...

BJP Allegations : चंद्रकांत खैरे यांनी भाजपने आपल्याला आणि मुलाला पक्षात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. शिवसेनेशी निष्ठा जपत त्यांनी भाजपचे आमिष नाकारले आणि फोडाफोडी राजकारणावर टीका केली.
Chandrakant Khaire BJP Allegations
Chandrakant Khaire BJP AllegationsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : भाजपने या राज्यात अनेकांची घर फोडून राजकारण आणि त्यातून सत्ता मिळवली. लोकसभा निवडणुकीआधी मला पक्षात येण्याची आॅफर दिली होती. तुम्हाला राज्यसभेवर घेतो, राज्यपाल करतो असे आमिष दाखवले गेले. मोदी-शहांपासून अनेक भाजप नेत्यांचे मला फोन आले, पण मी बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक असल्याने या सगळ्या आॅफर फेटाळल्या. पण भाजपने आता माझे घरचं फोडण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलालाच पक्षात खेचण्याचा प्रयत्न झाला. पण तो मी हाणून पाडल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.

'सकाळ'शी संवाद साधताना चंद्रकांत खैरे यांनी भाजपचे राजकारण आणि फोडाफोडीवर टीका केली. लोकसभा निवडणुकीआधी आपल्याला भाजपने पक्षात येण्याची आॅफर दिली होती. परंतु माझ्या सारख्या सामान्य शिवसैनिकाला नगरसेवक, दोनवेळा आमदार, चारवेळा खासदार, राज्यात मंत्री करणाऱ्या बाळासाहेबांना मी का सोडून जाऊ? मला आता काही नको, पदं येतात, जातातं नशिबात असलं तर ते पुन्हा मिळेल. पण पक्षनिष्ठा आणि प्रामाणिकपणा तुम्हाला जपावा लागतो.

इतकी वर्ष मी शिवसेनेत बाळासाहेब, उद्धवसाहेब-आदित्य ठाकरे अशा तीन पिढ्यांसोबत काम करतो आहे. मला पक्षाने भरपूर काही दिलं, त्यामुळे भाजपची आॅफर नाकारली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत संकट काळात त्यांच्या पाठीशी उभं राहिलो. पण घर फोडणाऱ्या भाजपची माझ्या घरावरही वक्रदृष्टी पडली होती. माझा मुलगा ऋषीकेश यालाच भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न स्थानिक नेत्यांनी केला. मला जेव्हा हे कळालं तेव्हा माझ्यासाठी तो मोठा धक्का होता.

Chandrakant Khaire BJP Allegations
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार संतापले, पुन्हा सरकारवर बरसले; विधानसभेत चांगलंच झोडपलं...

माझी सगळी हयात बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेत गेली. मी पक्षाचा मोठा नेता आहे, आणि माझाच मुलगा ज्यांनी शिवसेना फोडली त्या पक्षात जाणार हे कळाल्यावर मी व्यथित झालो होतो. युवासेनेचा जबाबदार पदाधिकारी भाजपमध्ये गेला असता तर त्यातून वाईट संदेश गेला असता. शिवसेना नेत्याचा मुलाग पक्ष सोडून गेला हे योग्य होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर आम्ही सगळ्या कुटुंबाने एकत्रित बसून त्याची समजुत काढली.

Chandrakant Khaire BJP Allegations
Chandrakant Khaire: ...म्हणून एकनाथ शिंदेंना गोंजरणं सुरू; चंद्रकांत खैरेंनी भाजपला डिवचलं

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही कानावर ही बाब घातली. मुलाला त्यांच्याकडे घेऊन गेलो, त्यांनीही समजुत काढत मी पक्ष संघटनेसाठी केलेल्या कामाची आठवण करून देत त्याला रोखल्याचे खैरे यांनी सांगितले. शिवसेना (Shivsena) फोडणाऱ्यांबद्दल मला प्रचंड राग आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी शिवसेना काढली. पण स्वार्थी राजकारण आणि सत्तेच्या हव्यासापोटी भाजपने शिवसेना फोडल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला.

शिवसेनेचे बोट धरून भाजप मोठी झाली..

1988 मध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेनेने हिंदू मतांमध्ये विभाजन टाळण्यासाठी भाजपपुढे युतीचा प्रस्ताव दिला होता. मी स्वतः तो भाजपच्या (BJP) स्थानिक नेत्यांना दिला, पण त्यांनी आम्हाला कमी लेखले आणि युती शक्य नसल्याचे सांगितले. तेव्हाचे राज्यातील नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनाही आपण महापालिकेत युती करा, असा प्रस्ताव दिला, पण त्यांनी शक्य नसल्याचे सांगत आम्हाला दर्लक्षित केले. पण 60 पैकी जेव्हा आमचे सत्तावीस नगरसेवक पहिल्याच फटक्यात निवडून आले, तेव्हा भाजपला आमचे हिंदुत्व आणि ताकद दिसली. त्यानंतर मुंडे-महाजन हे मातोश्रीवर बाळासाहेबांकडे गेले आणि तेव्हापासून राज्यात शिवसेना-भाजप युती झाली, अशी आठवणही खैरे यांनी यावेळी सांगितली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com