Shivsena UBT News : 'मला उमेदवारी हवी होती, खैरेंना दिली, जनतेने त्यांना..' ; अंबादास दानवे स्पष्टच बोलले..

Ambadas danve Vs chandrakant khaire : 'आमच्याच पक्षातील काही लोकांनी प्रामाणिकपणे काम केले नाही.', असे म्हणत थेट जिल्हाप्रमुख म्हणून दानवे यांच्याकडे बोट दाखवले.
Ambadas danve Vs chandrakant khaire
ambadas danve chandrakant khairesarkarnama

राज्यात महायुतीच्या विरोधात वातावरण असतांना मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांचा दुसऱ्यांदा पराभव झाला. गेल्या निवडणुकीत साडेचार हजार मतांनी पराभूत झालेले खैरे यावेळी थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

खैरेंच्या या पराभवानंतर पुन्हा अंबादास दानवे विरुद्ध खैरे वादाचा अंक सुरू होताना दिसतो आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या विजयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे(Ambadas danve) यांनी लोकसभेची उमेदवारी नाकारल्याबद्दलची नाराजी पुन्हा एकदा व्यक्त केली.

Ambadas danve Vs chandrakant khaire
Harshvardhan Jadhav News : 'माझी लायकी दाखवून दिलीत', चांगलं झालं.. हर्षवर्धन जाधव झाले उद्विग्न !

संभाजीनगरमध्ये मशाल का पेटली नाही? तुम्ही उमेदवार असते तर चित्र वेगळे दिसले असते का? या प्रश्नाला उत्तर देतांना दानवेंनी 'आता जरतरवर बोलण्यात काही अर्थ नाही. मी इच्छूक होतो, पक्षाकडून उमेदवारी मागितली होती, पक्षाने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली, पण जनतेने त्यांना नाकारले.' अशी रोखठोक प्रतिक्रिया दानवे यांनी दिली.

तर दुसरीकडे चंद्रकांत खैरे(chandrakant khaire ) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमच्याच पक्षातील काही लोकांनी प्रामाणिकपणे काम केले नाही, असे म्हणत थेट जिल्हाप्रमुख म्हणून दानवे यांच्याकडे बोट दाखवले. यावरून आता पुढील काही दिवस जिल्ह्यातील राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाजीनगर मधून उमेदवारी मिळावी यासाठी 2019 मध्येच अंबादास दानवे यांनी पक्षाकडे मागणी केली होती.

Ambadas danve Vs chandrakant khaire
Sandipan Bhumare : 'या' त्रिमूर्तींनी दिलं भुमरेमामांना लीड; पण मंत्र्यांच्या मतदारसंघात पिछेहाट

पण विद्यमान खासदारांना डावलून नवा उमेदवार देण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नकार दर्शवला होता, असे बोलले जाते. खैरे यांचा गेल्या निवडणुकीत पराभव झाला, त्यानंतर 2024 मध्ये पुन्हा दानवेंनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली. पण अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभव झालेल्या खैरे यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय ठाकरेंनी घेतला. परंतु ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे सांगूनही मतदारांनी खैरेंना नाकारले.

लोकसभा निवडणुकीत मी एकटा पडलो होतो, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची जिल्ह्यात थांबून निवडणूक यंत्रणा, कार्यकर्त्यांना कामाला लावण्याची जबाबदारी होती, पण ते इथे थांबले नाही. दुसरे आमचे जिल्हाप्रमुख आजारी होते, ते आलेच नाही. आमच्याच लोकांनी दगा दिल्यामुळे माझा पराभव झाला.', असा आरोप खैरे यांनी केला आहे.

एवढेच नाही, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा फटका पक्षाला बसू नये, यासाठी येत्या दोन-तीन दिवसात आपण उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांची भेट घेऊन या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घालणार आहोत, असेही खैरे यांनी सांगितले. एकूणच संभाजीनगरमधील शिवसेना ठाकरे गटाच्या पराभवाचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. ठाकरे यांच्या दरबारात दानवे-खैरे ऐकमेकांवर काय काय आरोप करतात? यावर आगामी विधानसभा निवडणुकीचे जिल्ह्यातील चित्र अवलंबून असणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com