

Shivsena : एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर अयोध्येला गेलेले मंत्री, आमदार, खासदार हे नाटकी आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे नाटकं सुरू आहे. जणू काही हेच खरे रामभक्त आणि दुसरे खोटे. (Eknath Shinde) मुख्यमंत्री शिंदे यांचे वागणे म्हणजे मुंह मे राम, बगल मे छुरी, असेच असल्याचा टोला ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी लगावला.
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे एकवचनी होते, एकनाथ शिंदे हे तर अनेकवचनी असल्याची टीकाही खैरे यांनी केली. (Chandrakant Khaire) खैरे म्हणाले, मी एक कडवट हिंदू आणि धार्मिक वृत्तीचा माणूस आहे. अयोध्येत झालेल्या कारसेवेत मी सहभागी होतो. (Shivsena) आज अयोध्येत जी रामलल्लाची मुर्ती ठेवण्यात आली आहे, ती पहिल्यांदा जेव्हा ठेवली तेव्हा मी तिथे होतो. पण आज जे तिथे गेलेत ते फक्त शोबाजी करण्यासाठी गेले आहेत.
उद्धव ठाकरे याच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेवर आलेल्यांना खरी रामभक्ती काय कळणार? उद्धव ठाकरे यांनी पहिले राम मंदिर फिर सरकार, असा नारा दिला होता याची आठवण देखील खैरे यांनी यावेळी करून दिली. त्यामुळे आपणच खरे राम भक्त आहोत, बाकीचे नाहीत हे दाखवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न दिसतो.
अयोध्येत जावून देखील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यावर टीका करतात. अयोध्येत रामाचे दर्शन घ्यायला गेलात का आमच्यावर टीका करायला? असा सवाल देखील खैरे यांनी उपस्थितीत केला. श्रीराम हे एकवचनी होते, पण शिंदे अनेकवचनी आहेत. जे उद्धव ठाकरेंचे झाले नाही, ते श्रीरामाचे काय होणार? अशी टीकाही त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.