Chandrakant Khaire On Raj Thackeray : चंद्रकांत खैरे म्हणतात राज ठाकरेंची भूमिका योग्यच! उठसूठ युतीवर कोणीही बोलू नये..

Shiv Sena leader Chandrakant Khaire defends Raj Thackeray's position, calling his stand appropriate and criticizing those who speak publicly about political alliances. : एखाद्या पदाधिकाऱ्याने किंवा कार्यकर्त्याने सोशल मीडियावर चुकीची पोस्ट किंवा कमेंट केली तर त्यावरून विरोधक रान उठवून संभ्रम निर्माण करण्याची अधिक शक्यता असते.
Chandrakant Khaire-Raj Thackeray News
Chandrakant Khaire-Raj Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT-MNS News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्या एकत्र येण्यावर माझ्या परवानगीशिवाय कोणीही भाष्य किंवा सोशल मीडियावर पोस्ट करू नये, अशी सक्त ताकीद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल दिली. यावरून ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही? याबद्दल उलट सुलट चर्चा आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मात्र राज ठाकरे यांची भूमिका योग्यच असल्याचे ' सरकारनामा' शी बोलताना सांगितले. राज ठाकरे यांनी व्यक्त केलेली भूमिका वावगी नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंच्या एकत्र येण्यावर खालच्या फळीतील नेत्यांनी उलट सुलट किंवा चुकीच्या प्रतिक्रिया देऊन युतीबद्दल संभ्रम किंवा गैरसमज पसरवू नये, हा त्यामागचा हेतू असावा. तो चुकीचा नसून पक्षाकडून अधिकृत जबाबदारी दिलेल्या व्यक्तीनेच पक्षाच्या प्रमुखांच्या परवानगीने बोलावे याबाबत कुठलाही वाद असण्याचे कारण नाही.

एखाद्या पदाधिकाऱ्याने किंवा कार्यकर्त्याने सोशल मीडियावर चुकीची पोस्ट किंवा कमेंट केली तर त्यावरून विरोधक रान उठवून संभ्रम निर्माण करण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे पक्षाने नेमून दिलेल्या प्रवक्त्यांनी किंवा प्रमुख नेत्यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भूमिका मांडणे योग्य ठरते. त्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिलेले आदेश किंवा समज चुकीची म्हणता येणार नाही. आमच्या पक्षाची आणि आमच्या नेत्यांची तीच भूमिका राहील.

Chandrakant Khaire-Raj Thackeray News
Raj-Uddhav Thackeray Alliance : राज ठाकरेंच्या आदेशाचे टायमिंग काळजाचा ठोका चुकवणारे! उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढणार!

आमच्याकडून मात्र अधिकृत नियुक्त केलेले प्रवक्ते किंवा नेत्यांव्यतिरिक्त शिवसेना- मनसे युतीवर कोणीही चुकीचे, वादग्रस्त भाष्य करत नाही. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात कुठलेही आदेश द्यावे लागले नाहीत, असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. मराठीच्या मुद्द्यावर दोन भाऊ वीस वर्षानंतर एकत्र येत आहेत याची पोटदुखी सत्ताधारी पक्षाला आहे.

Chandrakant Khaire-Raj Thackeray News
Raj-Uddhav Thackeray: सावरलेला डाव राज ठाकरेंच्या 'एन्ट्री'ने पुन्हा विस्कटणार; युतीची खेळी अनेकांचा जाणार बळी !

यातून गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळी विधान आणि प्रतिक्रिया देऊन महायुतीकडून संभ्रम निर्माण केला जात आहे. मात्र राज आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात घेतलेली भूमिका आणि मराठी माणूस, मराठी भाषेच्या लढ्यासाठी एकत्र येण्याचा घेतलेला निर्णय बदलणार नाही, असा विश्वासही खैरे यांनी व्यक्त केला.

Chandrakant Khaire-Raj Thackeray News
Shivsena UBT-MNS : ठाकरे बंधुंच्या युतीच्या आधीच शिवसेनेसह महायुतीला धक्का देण्याची तयारी? तळकोकणात मनसे-शिवसेनेत गुप्त बैठका

ठाकरे बंधू एकत्र यावेत ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती आणि ती आता पूर्ण झालेली आहे.  त्यामुळे विरोधकांनी कितीही दणआपट केली, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचा आता उपयोग होणार नाही.  ठाकरे बंधूंची एकजूट भविष्यातही कायम राहील आणि आगामी सर्वच निवडणुकांमध्ये ही युती विरोधकांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही चंद्रकांत खैरे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com