Raj-Uddhav Thackeray Alliance : राज ठाकरेंच्या आदेशाचे टायमिंग काळजाचा ठोका चुकवणारे! उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढणार!

MNS BMC Elections : राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या सकारात्मक चर्चा सुरू असताना तसेच मीरा-भाईंदरच्या यशस्वी आंदोलनानंतर माझ्या परवानगीशिवाय बोलू नका, हा राज ठाकरेंनी दिलेला आदेशाने राज यांच्या मनात वेगळाच विचार सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Raj-Uddhav Thackeray Alliance
Raj-Uddhav Thackeray Alliance sarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray Politics : मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधू एकत्र आले. आम्ही एकत्र राहण्यासाठी एकत्र आल्याचे उद्धव ठाकरेंनी जाहीर केले. मराठीच्या मुद्यावर राज ठाकरे हे आक्रमक दिसले. मराठीला विरोध करणाऱ्यांना मारताना व्हिडिओ काढू नका. फक्त मारा, असे त्यांनी म्हटले. त्यांनी ज्या मीरा-भाईंदरच्या प्रकरणावरून हे वक्तव्य केले. तेथील मराठी-अमराठी वाद पेटला आहे.

परप्रांतियांनी तेथे मोर्चा काढला होता. या मोर्च्यानंतर मंगळवारी (ता.8) मनसेकडून मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्याच्या आधीच पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले. त्यामुळे वातावरण अधिकचे तापले. मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी मीरा-भाईंदरमध्ये जमले आणि हा मोर्चा यशस्वी झाला. हा मोर्चा यशस्वी होत असताना राज ठाकरेंनी ट्विटवरून एक स्पष्ट आदेश म्हणत ट्विट केले.

राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही. आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही.'

राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या सकारात्मक चर्चा सुरू असताना तसेच मीरा-भाईंदरच्या यशस्वी आंदोलनानंतर माझ्या परवानगीशिवाय बोलू नका, हा राज ठाकरेंनी दिलेला आदेशाने मनसेसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला असण्याची शक्यता आहे.

Raj-Uddhav Thackeray Alliance
बदल्यांमध्ये हस्तक्षेप करू नका! महिला जिल्हाधिकाऱ्यांनी थेट मंत्री, खासदार, आमदारांनाच सुनावलं...

काळजी घेतायेत की वेगळाच प्लॅन

ठाकरे बंधु एकत्र येत असताना मराठी विरुद्ध हिंदीचे राजकारण पेटत असताना राज ठाकरेंचे आदेश हे संभ्रमात टाकणारे आहेत. कारण मनसेचे पदाधिकारी उघडपणे हिंदीच्या विरोधात बोलत आहेतच शिवाय ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने उत्साही दिसत आहेत. त्यामुळे आपल्या संभाव्य युतीविषयी चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून ते काळजी घेत आहेत का? असा प्रश्न निर्माण होतोय.

राज ठाकरेंच्या आदेशाने एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये काहीसे आनंदाचे वातावरण आहे. कारण त्यांच्या आदेशामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार याचे चित्र स्पष्ट होत नाही. ज्या प्रकारे उद्धव ठाकरे भाजपच्या, शिंदेंच्या विरोधात उघडपणे बोलत आहेत. तशी भूमिका राज यांनी अजून तरी घेतलेली नाही.

ठाकरेंच्या विरोधात भाजप अ‍ॅक्टिव्ह

ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिकेत मोठा फटका भाजपला बसण्याचा शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिका ही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे ते कोणत्याही तडजोडी करून भाजपला पराभूत करण्यास उत्सुक दिसत आहेत. त्या तुलनेत सात टक्के मराठी मते मुंबईत असलेल्या मनसेकडे गमवण्यासारखे फारसे काही नाही. उद्धव यांच्यासोबत गेल्याने त्यांना फायदाच होण्याची शक्यता आहे. कारण मुंबईत मराठीच्या मुद्या हा तापतच जाणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती होऊ नये यासाठी भाजप पडद्यामागून प्रयत्न करणार हे निश्चित.

युतीवर राज ठाकरेंचे थेट भाष्य नाही

राज ठाकरे यांनी विजयी मेळाव्यात आपला फोकस मराठीच्या मुद्यावरून हलू दिला नाही. हिंदी सक्तीवरून त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले तसेच बाळासाहेब ठाकरे यांना जे जपले नाही ते मुख्यमंत्री फडणवीसांना जमले त्यांनी आम्हा दोघा भावांना एकत्र आणल्याचे म्हटले. राज ठाकरेंचे भाषणाचे कौतुक होत असले तरी त्यांनी स्पष्टपणे उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याबाबत कोणतेही थेट भाष्य केले नाही. 2012 आणि 2017 मध्ये उद्धव ठाकरेंनी युतीची चर्चा करून मनसेला गुंतवून ठेवले आणि ऐनवेळी माघार घेत 2012 ला भाजपसोबत तर 2017 ला स्वबळावर निवडणूक लढली. त्यामुळे राज ठाकरे हे सावध पावले टाकत असल्याची शक्यता आहे.

युतीबाबत संभ्रम

राज ठाकरे यांच्या वक्तव्यांनी आणि आदेशांनी सध्या महाराष्ट्रातील मराठी विरुद्ध हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर नवे राजकीय समीकरण सूचित केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी मराठी अस्मितेच्या मुद्यावर ठाम भूमिका घेतली असली तरी माध्यमांशी बोलण्यावर घातलेली बंदी आणि आदेशाचे ट्वीटचे टायमिंग यामुळे मनसेच्या भविष्यातील युती संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.

मराठी अस्मिता, भाषिक संघर्ष, मनसेचे आक्रमक धोरण, आणि ठाकरे बंधूंच्या नात्यातील राजकीय समीकरणे हे सर्व घटक मिळून पुढील महापालिका निवडणुकांची दिशा ठरवतील. मात्र याबाबत राज यांनी अजुनही ठोस धोरण स्वीकारल्याचे दिसत नाही.

बार्गेनिंग पॉवर कायम

उद्धव ठाकरेंसोबत युतीवर थेट न बोलता राज ठाकरे यांनी आपली बार्गेनिंग पॉवर कायम ठेवली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही महापालिकेत मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल हे निश्चित दिसत आहे. मात्र, स्वबळावर लढणारी मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत लढताना आपी बार्गेनिंग पॉवर कमी नाही हे दाखवून देईल. त्यामुळे राज ठाकरे हे थेट युतीबाबत स्पष्ट शब्द देत नसल्याचे देखील दिसत आहे. तसेच थेट भाजप किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत न जाता आपण वेगळे लढतो तर त्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसले हे माहीत असल्याने जास्तीत जास्त जागा आपल्याकडे घेण्याचे राज ठाकरें युतीवर थेट भाष्य न करता प्रयत्न दिसतोय.

Raj-Uddhav Thackeray Alliance
Mahayuti masterplan : ठाकरे बंधूंना धक्का देणारा महायुतीचा मास्टरप्लॅन; तीन पक्षांचे मिशन ठरले; उमेदवारी देण्यापूर्वी घेणार मोठा निर्णय!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com