Chandrakant Khaire : अंधेरीची निवडणूक आम्हीच जिंकणार, विजयाची मशाल पुन्हा पेटणार..

शिवसैनिक त्यासाठी झपाट्याने कामाला लागला आहे, मी स्वतः अंधेरीत प्रचारासाठी जाणार आहे. शिवसेनेचे मशाल चिन्ह घरोघरी नेवून आम्ही विजय मिळवू. (Chandrakant Khaire)
Shivsena Leadar Khaire- Rutuja Latke News, Aurangabad
Shivsena Leadar Khaire- Rutuja Latke News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे व शिवसेनेसोबत कसे वागत आहेत? हे महाराष्ट्रातील जनता पाहते आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत (Shivsena) शिवसेनेला उमेदवारच मिळू नये, असे प्रयत्न करणे म्हणजे राजकारणातील अत्यंत घाणेरडा प्रकार म्हणावा लागेल. किती खालच्या पातळीवर हे लोक गेलेतं हे दिसून येते.

पण अंधेरीच्या पोटनिवडणुकीत (Byelection) सत्याचाच विजय होणार आहे. शिवसेना ही जागा पुन्हा मोठ्या मताधिक्याने जिंकणारच, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Channdrakant Khaire) यांनी केला. आमच्या अर्धा प्रचार देखील झाल्याचे सांगतानाच आपण प्रचाराला जाणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अंधेरी पुर्व निवडणुकीत उद्या उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. ऋुतूजा लटके यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जात असतांना महापालिकेने त्यांच्या राजीनामा मंजुर न केल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. लटके यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली, अखेर मुंबई उच्च न्यायालयाने लटके यांचा राजीनामा मंजूर करून उद्या ११ वाजेपर्यंत कोर्टाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

कोर्टाच्या निकालाने शिवसेनेला दिलासा मिळाला आणि लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग देखील मोकळा झाला. यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि हा सत्याचा विजय असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेच्या मार्गात अडथळे आणण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतचे गद्दार लोक करत आहेत. निवडणूक आयोगाला हाताशी धरून त्यांचे सुरू असलेले प्रयत्न अखरे न्यायालयानेच हाणून पाडले.

Shivsena Leadar Khaire- Rutuja Latke News, Aurangabad
लोकप्रतिनिधींचा विरोध, तरी जिल्हाधिकारी पदी नियुक्ती, पांडेयजी तुम्हाला हे कसं जमलं..

ऋतुजा लटके यांना न्याय मिळाला, आता त्या उमेवारी दाखल करू शकतील. शिवसेनेला उमेदवारच मिळू नये यासाठी खालच्या पातळीला जाऊन राजकारण केले गेले. पण याकडे जनता पाहत आहे आणि ती निवडणुकीत यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.

अंधेरी पुर्वची जागा शिवसेनेची होती आणि शिवसेनेकडेच राहील. आम्ही ती मोठ्या मताधिक्याने जिंकू. शिवसैनिक त्यासाठी झपाट्याने कामाला लागला आहे, मी स्वतः अंधेरीत प्रचारासाठी जाणार आहे. शिवसेनेचे मशाल चिन्ह घरोघरी नेवून आम्ही विजय मिळवू, असा विश्वास देखील खैरे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com