Sambhaji Nagar: अखेर संभाजीनगरच्या नागरिकांना मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेल संदर्भातील 'तो' महत्वाचा निर्णय घेतला मागे

Chhatrapati Sambhaji Nagar : गेल्या आठवडाभरापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याची चर्चा सुरु झाल्यानं नागरिकांची वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी पंपांवर झुंबड उडाली होती.
Fuel prices expected to fall after the central government announced a reduction in excise duty on petrol and diesel.
Fuel prices expected to fall after the central government announced a reduction in excise duty on petrol and diesel. sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी असून जिल्हा प्रशासनानं शहरात पेट्रोल वितरणाच्या संदर्भात दोन दिवसांपूर्वी घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळं आता नागरिकांनी इंधनासंदर्भात नागरिकांनी पॅनिक न होण्याचं आवाहनही जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

Fuel prices expected to fall after the central government announced a reduction in excise duty on petrol and diesel.
Ashok Kharat News: खरातनं अनेकांना कसं गंडवलं? कशी होती त्याची मोडस ऑपरेंडी? फेस, हॉट, कोल्ड' रीडिंगचा वापर

इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसच्या तुटवडा निर्माण झाल्याची चर्चा होती. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर इंधनासाठी आणि गॅससाठी नागरिकांनी रांगा लावल्याचं वृत्तवाहिन्यांवर पाहायला मिळालं. गेल्या आठवडाभरापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याची चर्चा सुरु झाल्यानं नागरिकांची वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी पंपांवर झुंबड उडाली होती. पुन्हा कधी पेट्रोल मिळेल याची खात्री नसल्यानं लोक मोठ्या प्रमाणावर आपल्या वाहनांमध्ये इंधन भरुन ठेवत होते. त्यामुळं एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागल्यानं पंपाचा दररोजचा साठाही संपू लागला होता. त्यामुळं सहाजिकच लोकांचा असा समज होत होता की, खरोखरच इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Fuel prices expected to fall after the central government announced a reduction in excise duty on petrol and diesel.
Tukaram Mundhe News : कुणालाच जमलं नाही ते तुकाराम मुंढेंनी करून दाखवलं! दिव्यांगासाठी घेतला महत्वाचा निर्णय

दरम्यान, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक वाहनांना मर्यादित इंधन देण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगर जिल्हा शासनाला दोन दिवसांपूर्वी घेतला होता. तसे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते, त्यानुसार, दुचाकीसाठी २०० रुपये तर तीनचाकीसाठी आणि चारचाकीसाठी २,००० रुपयाचे पेट्रोल-डिझेल देण्याचा निर्णय घेतला होता.

Fuel prices expected to fall after the central government announced a reduction in excise duty on petrol and diesel.
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवरही गुन्हा दाखल होणार? सुषमा अंधारे अन् रुपाली पाटलांनी एकत्र येत लावली ताकद

पण आता पेट्रोल-डिझेल वितरण करणाऱ्या सर्व कंपन्यांची चर्चा केल्यानंतर इंधनाचा साठा आणि पुरवठा भरपूर आहे त्यामुळं कोणतीही अडचण नाही. शॉर्टेज नसल्यामुळं आता लागेल तितके पेट्रोल-डिझेल मिळणार आहे. त्यामुळे लोकांनी पॅनिक न होता गर्दी करू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. त्याचबरोबर दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी घातलेली इंधनाची मर्यादा रद्द केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com