Lok Sabha Elections 2024: छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार खैरे की दानवे ? ठाकरेंनी 'असा' काढला तोडगा

Ambadas Danve vs Chandrakant Khaire: लोकसभा उमेदवारीवरून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात 'तू तू.. मै मै'; ठाकरेंनी घेतली तातडीची बैठक
Chandrakant Khaire, Uddhav Thackeray, Ambadas Danve
Chandrakant Khaire, Uddhav Thackeray, Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या अनुषंगानेच आता राजकीय पक्षांकडून लोकसभेच्या जागा लढवण्यासाठी कंबर कसली आहे. यातच लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेलेही सरसावले आहेत.

यात ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपण छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे यांच्यापैकी उद्धव ठाकरे कोणाला मैदानात उतरवणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात 'तू तू..मै मै' सुरू आहे. यातच आता उद्धव ठाकरे यांनी तातडीने 'मातोश्री'वर बैठक बोलावत आढावा घेतला. छत्रपती संभाजीनगरमधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मात्र, या बैठकीला खैरे आणि दानवे यांना न बोलवता लोकसभा मतदारसंघ आणि उमेदवारीसंदर्भात चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrakant Khaire, Uddhav Thackeray, Ambadas Danve
BRS Maharashtra News : महाराष्ट्रातील नेत्यांचे गुलाबी स्वप्न भंगले; BRS नेही वाऱ्यावर सोडले...

छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार कोण हवा ?

उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ आणि उमेदवारीसंदर्भात चर्चा केली. तसेच या बैठकीला आलेल्या पदाधिकाऱ्यांना लोकसभेचा उमेदवार कोण हवा ? चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे ? यासंदर्भात ठाकरेंनी वैयक्तिक विचारणा केल्याची माहिती आहे. तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल हा चंद्रकांत खैरे यांच्या नावावर असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.

या बरोबरच मागील लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील जातीय समीकरण आणि उमेदवार निवडी संदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आढावा घेतला. त्यामुळे खैरे आणि दानवेंच्या लोकसभा उमेदवारीच्या दाव्यानंतर आता ठाकरे काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले असतानाच आता स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेत ठाकरेंनी थेट तोडगा काढल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Chandrakant Khaire, Uddhav Thackeray, Ambadas Danve
Ambadas Danve News : लोकसभेची उमेदवारी दानवेंना की खैरेंना, दानवे म्हणतात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com