BJP Raju Shinde News : ठाकरे गटात प्रवेशाआधी बोभाटा ; भाजपच्या राजू शिंदेंचं तळ्यात-मळ्यात!

Raju Shinde will Enter the Thackeray Group : राजू शिंदे यांनी 5 जून रोजी भाजप सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे पत्र समाज माध्यमावर व्हायरल केले होते.
Raju Shinde
Raju ShindeSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar BJP Politics News : छत्रपती संभाजीगनरातील भाजपच्या पठडीत तयार झालेले माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाआधीच बोभाटा झाल्याने अडचण झाली आहे. शिंदे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह रविवार ( ता.7) रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्यात पक्षप्रेवश करणार होते. पण त्यांच्या या पक्षांतराची बातमी फुटली (की त्यांनी पेरली) अन् त्यांना थांबवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झाले.

शिंदे यांचे राजकारणातील गाॅडफाद ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे, मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) या तिघांनी शनिवारी दिवसभर राजू शिंदे यांच्याशी स्वतंत्र चर्चा केल्या. हरिभाऊ बागडे यांच्या निवासस्थानी सावे यांनी शिंदे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. तर रावसाहेब दानवे यांनी स्वतंत्र चर्चा करत शिंदे यांची समजूत काढली.

दरम्यान, राजू शिंदे यांनी 5 जून रोजी भाजप सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे पत्र समाज माध्यमावर व्हायरल केले होते. विधानसभेच्या पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या राजू शिंदे यांची महायुतीमुळे अडचण झाली. आगामी विधानसभा निवडणूक महायुती एकत्रितपणे लढणार असल्याने सहाजिकच पश्चिमची जागा शिवसेना शिंदे गटाकडे जाणार आहे.

Raju Shinde
Sambhajinagar Politics : संभाजीनगरात भाजपकडून 'डॅमेज कंट्रोल'; ठाकरेंकडे निघालेल्या नेत्याला रोखण्यासाठी भाजपकडून मनधरणी

राजू शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक संजय शिरसाट(Sanjay Shirsat) हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. सलग ती वेळा त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला सुटण्याची शक्यता नाही. त्यामुळे आमदारकीसाठी राजू शिंदे यांनी थेट ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाहीतर विधानसभेनंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीत अनेक माजी नगरसेवकांना उमेदवारीचा शब्द मिळवत एक मोठा गटच ते सोबत घेऊन जाण्याच्या तयारीत होते.

पण कुठलेही निर्णय किंवा पक्ष प्रवेशाआधी कमालीची गुप्तता पाळणाऱ्या भाजपच्या पठडीत तयार झालेल्या राजू शिंदे(Raju Shinde) यांना मात्र अशी गुप्तता पाळता आली नाही. उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगरातील मेळाव्याच्या दोन दिवसआधीच राजू शिंदे यांच्या पक्षांतराच्या बातम्या बाहेर आल्या. आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून दबाव वाढत असल्याने राजू शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे माध्यमांना सांगितले.

भाजपचे नेते अजूनही चूका मान्य करायला तयार नाही, आम्ही केलेल्या मागण्यांवर ठोस आश्वासन देत नाहीत. ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर मी इथपर्यंत आलो, त्यांना विचारल्याशिवाय कुठलेही पाऊल मला उचलता येणार नाही. ठाकरे गटात प्रवेश करण्याचा आमचा निर्णय पक्का आहे. कदाचित उद्या प्रवेश होऊ शकतो. पण जर कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर वाट पहायचे ठरवले तर मग थांबावे लागेल.

Raju Shinde
Uddhav Thackeray Vs Sanjay Shirsat : भाजपचाच खांदा वापरुन ठाकरे करणार संजय शिरसाटांची शिकार ?

मी आता त्यांच्याशी चर्चा करून रविवारी ठाकरे गटात प्रवेश करायचा की थांबायचे? याचा निर्णय जाहीर करेल, असे शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी राजू शिंदे यांच्या उद्याच्या पक्षप्रेवशाचे वृत्त फेटाळले आहे. काही मोठे प्रवेश होणार आहेत, पण त्यात राजू शिंदेंचे नाव नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com