Sambhajinagar Politics : संभाजीनगरात भाजपकडून 'डॅमेज कंट्रोल'; ठाकरेंकडे निघालेल्या नेत्याला रोखण्यासाठी भाजपकडून मनधरणी

Shivsena Vs BJP : माजी उपमहापौर शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष, आमदार हरिभाऊ बागडे, मंत्री अतुल सावे हे मैदानात उतरले आहेत. त्यांची शिंदे यांच्यासोबत बैठक सुरू आहे.
Atul Save-Haribhau Bagde,Raju Shinde
Atul Save-Haribhau Bagde,Raju ShindeSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar, 06 July : छत्रपती संभाजीनगरचे भारतीय जनता पक्षाचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह काही नगरसेवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपकडून आता डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न होताना दिसत आहे. माजी उपमहापौर शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष, आमदार हरिभाऊ बागडे, मंत्री अतुल सावे हे मैदानात उतरले आहेत. त्यांची शिंदे यांच्यासोबत बैठक सुरू असून या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी उपमहापौर राजू शिंदे (Raju Shinde) यांच्यासह सुमारे आठ ते दहा माजी नगरसेवक येत्या रविवारी (7 जुलै) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मराठवाड्यात भाजपला छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) गळती लागल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, शिंदे यांच्यासह नगरसेवकांनी पक्ष सोडू नये, यासाठी भाजपकडून मनधरणीचे प्रयत्न होताना दिसत आहेत.

भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नाराज नगरसेवकांची बैठक सुरू आहे. भाजपकडून राजू शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि आमदार हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीला माजी उपमहापौर राजू शिंदे हेही उपस्थित आहेत.

माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी शुक्रवारी रात्रीच तातडीने नगरसेवकांची बैठक बोलावली होती. त्यानंतर आज सकाळी पुन्हा ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत तातडीने पुन्हा एकदा बैठक सुरू आहे. त्या बैठकीला राजू शिंदे हेदेखील उपस्थित आहेत. त्यांना भाजपकडून कोणते आश्वासन मिळते, हे पाहावे लागणार आहे.

राजू शिंदे यांची मनधरणी करण्यात, हे नेते यशस्वी होऊ शकतात का, ते पाहणं महत्वाचं असणारं आहे. बैठक पार पडल्यानंतर राजू शिंदे यांचीही काय भूमिका असणार आहे. हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Atul Save-Haribhau Bagde,Raju Shinde
Eknath Shinde : पायी वारी करणारे शिवसेनेचे दुसरे मुख्यमंत्री : एकनाथ शिंदे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com