Chhatrapati Sambhajinagar Constituency: बाण, मशाल की पतंग ? कोणालाच अंदाज लागेना.. 'ये चलरा', नुसतीच चर्चा...

Lok Sabha Election : संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी उत्साह मतदानाला सुरुवात झाली. हा उत्साह थोड्याफार प्रमाणात कमी-जास्त होत होता, पण तो सायंकाळी पाचवाजेपर्यंत कायम होता.
Khaire, Bhumre or Imtiaz Jalil
Khaire, Bhumre or Imtiaz JalilSarakarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मतदानापुर्वी मतांचे विभाजन, मराठा फॅक्टर, मोदी गॅंरटी, गद्दारी, हिंदुत्व अशा अनेक मुद्यांवर घसा ताणून जय-पराजयाचे दावे करणारे महाविकास आघाडी-महायुती-एमआयएम या प्रमुख पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आज मात्र शांत आहेत. बाण, मशाल की पतंग ? याचा अंदाज कुणाला लागत नसल्याने दिवसभर केवळ ये चलरा अशीच चर्चा सुरू होती.

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी उत्साह मतदानाला सुरुवात झाली. हा उत्साह थोड्याफार प्रमाणात कमी-जास्त होत होता, पण तो सायंकाळी पाचवाजेपर्यंत कायम होता. त्यामुळे सकाळी सात ते सांयकाळी पाच पर्यंतच्या चार टप्यात एकूण 54 टक्के मतदानाची नोंद झाली. हा आकडा शेवटच्या तासभरात दहा ते पंधरा टक्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Khaire, Bhumre or Imtiaz Jalil
Lok Sabha Election 2024 : पुण्यात काँग्रेसची मदार असलेल्या मतदारसंघात मतदानाचा आकडा कमी, फटका बसणार?

शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. महायुतीकडून मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre ), महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे (Chandarkant Khaire), एमआयएमचे इम्तियाज जलील (Imtiyaj Jalili) या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये तिरंगी लढत झाली. संदीपान भुमरे यांच्यासाठी भाजपची (Bjp) संपुर्ण यंत्रणा प्रत्यक्षात मैदानात उतरल्याचे चित्र होते. शिंदे गटाकडे मतदान करवून घेणारी यंत्रणाच नव्हती हे आज स्पष्ट झाले.

निवडक ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते दिसले. इतर सगळ्या मतदान केंद्राबाहेर मात्र भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी मतदान करून घेतांना दिसले. शिवसेना ठाकरे गट आणि त्यांच्यासोबतीला काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गट असल्याने महाविकास आघाडीची यंत्रणा कार्यरत होती. त्यामुळे संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे या दोघांमध्ये अटीतटीची लढत झाली असल्याचा दावा दोन्ही बाजूचे कार्यकर्ते करतांना दिसले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शहरातील मुस्लिम बहुल भागात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. हे सगळे मतदान इम्तियाज जलील यांना एकगठ्ठा मिळाल्याचा दावा एमआयएमकडून केला जातोय. अशावेळी ठामपणे हाच उमेदवार विजयी होईल, याचा दावा कोणात पक्ष करतांना दिसत नाहीये.

राज्यात शिवसेना पक्षात फुट पडली तेव्हा संभाजीनगर जिल्ह्यातील सहा पैकी पाच आमदार हे शिंदे गटासोबत गेले होते. कन्नड विधानसभेचे आमदार उदयसिंह राजपूत सोडले तर सगळे आमदार शिवसेना-भाजपचे असताना महायुती विजयाचा दावा करतांना कचरत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक या मतदारसंघात लक्ष घातले होते.

Khaire, Bhumre or Imtiaz Jalil
Jalna Loksabh Constituency : मतदारांचा उत्साह कोणाच्या पथ्यावर? दानवे की काळे?

दोन-तीन दिवस ते संभाजीनगरात तळ ठोकून होते. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे, पश्चिमचे संजय शिरसाट, मध्यचे प्रदीप जैस्वाल, भाजपचे पुर्वचे आमदार आणि मंत्री अतुल सावे, गंगापूरचे प्रशांत बंब यांच्या विधानसभा मतदारसंघातून संदीपान भुमरे यांना किती मतदान होते यावर त्यांचा विजय अवलंबून असणाार आहे.

पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार वैजापूरमध्ये सर्वाधिक 56.29 टक्के तर सर्वात कमी संभाजीनगर मध्य मतदारसंघात 52.17 टक्के मतदान झाले आहे. याशिवाय कन्नड 53.75, संभाजीनगर पश्चिम 53.11, संभाजीनगर पुर्व 54.66 तर गंगापूर विधानसभा मतदारसंघात 54.52 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

Khaire, Bhumre or Imtiaz Jalil
Chandrakant Khaire News: प्रचार संपताच खैरेंनी घेतले भद्रा मारोतीचे दर्शन..

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com