Chhatrapati Sambhajinagar Constituency : 'माझ्यासाठी राजसाहेबांची सभा घ्या, निवडून आल्यावर पहिले त्यांच्या दर्शनाला येईन...'

Loksabha Election 2024 : 'खासदार म्हणून निवडून आल्यानंतर माझी हीच भूमिका राहील. निवडून येईपर्यंत मी पक्षाचा, त्यानंतर तुमच्या सगळ्यांचा असेल...'
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माझे पूर्वीपासूनचे चांगले संबंध आहेत, अजूनही आम्ही भेटत असतो. माझ्या प्रचारासाठी राजसाहेबांच्या सभेचे नियोजन करा, निवडून आल्यानंतर पहिल्यांदा त्यांचे दर्शन घ्यायला येईल, अशा शब्दांत संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी मनसेला साद घातली. राज ठाकरे यांनी देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली. (Chhatrapati Sambhajinagar Loksabha Election 2024)

त्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नेमलेल्या समन्वयकांच्या उपस्थितीत शहरात मनसे नेते बाळा नांदगावकर, दिलीप धोत्रे आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पालकमंत्री संदीपान भुमरे, शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल उपस्थित होते. या वेळी महायुतीच्या स्तंभ पूजन कार्यक्रमात मनसेला न बोलावण्याची चूक झाल्याचे मान्य करत यापुढे अशी चूक होणार नाही, अशी ग्वाही भुमरे यांनी आपल्या मार्गदर्शनात सुरुवातीलाच केली. आपल्याकडे प्रचाराला आता फक्त वीस दिवस राहिले आहे.

Raj Thackeray
MNS News: महायुतीच्या प्रचारात आता मनसेच्या इंजिनचाही आवाज घुमणार; राज ठाकरेंचा मराठवाड्याबाबत मोठा निर्णय

शहर, ग्रामीण भागात मेळावे, सभा, बैठका घ्याव्या लागणार आहेत. कमी वेळात नियोजन करताना काही कमी जास्त झालं तर सांभाळून घ्या, आम्हाला सांगा आम्ही लक्ष घालू. पण आता निरोप मिळाला की प्रचाराला या, तुमचा योग्य तो सन्मान राखला जाईल. लवकरच महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांचा एक मोठा मेळावा घेऊन आपण प्रचाराचे नियोजन करू. राज ठाकरे यांची सभा त्यांच्या वेळेनूसार केव्हा घेता येईल, ते ठरवा आम्हाला कळवा. राजसाहेबांची सभा झाली तर आपला विजय निश्चित आहे, असे सांगत भुमरे यांनी बाळा नांदगावकर यांना सभेच्या नियोजनाची गळ घातली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी प्रत्येकाशी बोलू शकणार नाही, पण जेव्हा जेव्हा निरोप येईल तेव्हा मनसेच्या (MNS) सगळ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यावे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बाळा नांदगावकर आपण यावे, असे आवाहन भुमरे यांनी केले. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतांना आपण कधी पक्ष, जात पाहिला नाही, प्रत्येकाचे काम करण्याचा प्रयत्न केला.

खासदार म्हणून निवडून आल्यानंतर माझी हीच भूमिका राहील. निवडून येईपर्यंत मी पक्षाचा, त्यानंतर तुमच्या सगळ्यांचा असेल. विरोध आता माझ्यावर आरोप-प्रत्यारोप करतील, पण त्याला आम्ही प्रचार सभांमधून उत्तर देऊच. पण ज्यांनी वीस वर्षे या जिल्ह्याला गाडण्याचे काम केले, त्यांना गाडण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. आपण सगळे मिळून या संधीचं सोनं करू, असे आवाहनही संदीपान भुमरे यांनी मनसेच्या बैठकीत केले.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Raj Thackeray
Raj Thackeray News : तब्बल 18 वर्षांनंतर राज ठाकरेंचं मत धनुष्यबाणाला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com