Bulldozer Action : मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर फिरला, आता आणखी पंचवीस नगरसेवकांवरही टांगती तलवार?

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Demolishes Illegal Properties : नाशिक येथील टीसीएस कंपनीतील कथीत धर्मांतर प्रकरणात एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याचे नाव उघड झाल्यानंतर महापालिकेने त्याच्या अनधिकृत मालमत्तांवर बुलडोझर चालवला होता.
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Demolishes AIMIM Corporator Matin Patel Illegal Properties
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Demolishes AIMIM Corporator Matin Patel Illegal Propertiessarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या तीन अनधिकृत मालमत्तांवर बुलडोझर कारवाई केली.

  2. या कारवाईनंतर इतर 22 ते 25 नगरसेवकांविरोधातील तक्रारी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

  3. तक्रारींच्या चौकशी अहवालाबाबत आयुक्त अमोल येडगे यांच्या वक्तव्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Chhatrapati Sambhajinagar News : नाशिक येथील टीसीएस कंपनीतील कथीत धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय देणारे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या तीन अनधिकृत मालमत्तांवर महापालिकेने बुधवारी बुलडोझर फिरवला. त्यानंतर इतर नगरसेवकांच्या विरोधातील तक्रारींचा विषय चर्चेत आला आहे.

अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण, दोनपेक्षा जास्त अपत्य अशा सुमारे 22 ते 25 नगरसेवकांच्या विरोधात महापालिका प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आता त्यांच्या अतिक्रमणांवरही कारवाईची टांगती तलवार आहे. या तक्रारींची संबंधित विभागांनी शहनिशा केल्याचे देखील सांगण्यात आले होते, पण त्याचा अहवाल अद्याप आपल्यापर्यंत आला नसल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

महापालिकेची जानेवारी महिन्यात निवडणूक झाली. तब्बल 10 वर्षानंतर निवडणूक झाल्यामुळे सर्वच पक्षांकडे इच्छुकांची मोठी गर्दी होती. त्यातून निवडून आलेल्या काही नगरसेवकांच्या विरोधात पराभूत उमेदवारांसह इतरांनी विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त केल्या. या तक्रारींची संख्या 22 ते 25 एवढी आहे. त्यात अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण, तिसरे अपत्य अशा तक्रारींचा समावेश आहे.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Demolishes AIMIM Corporator Matin Patel Illegal Properties
AIMIM corporator arrest : 'AIMIM'ला दुहेरी झटका! मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर, तर दुसरा नगरसेवक थेट जेलमध्ये!

नियमानुसार दोनपेक्षा जास्त अपत्य असतील तर महापालिका निवडणुकीला उभे राहता येत नाही. असे असताना देखील काही जणांनी या नियमाचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाच्या दफ्तरी आल्या आहेत. या तक्रारींची शहनिशा करण्यासाठी नगर रचना व अतिक्रमण विभागाला आदेश देण्यात आले होते. या विभागांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून अहवालही तयार केला. पण पुढे या अहवालाचे काय झाले? असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.

आयुक्त अमोल येडगे यांनी अद्याप अहवाल माझ्यापर्यंत आलेला नाही, असे सांगितले. पत्रकारांनी याविषयी आयुक्त अमोल येडगे यांना विचारले असता, तक्रारींबद्दलचा कोणताही अहवाल आपल्याला प्राप्त झालेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यावर त्याचा अभ्यास करून पुढील कारवाई करण्यात येईल. कारवाईपूर्वी संबंधित नगरसेवकांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Demolishes AIMIM Corporator Matin Patel Illegal Properties
NCP Politics : पुणे महापालिकेत राष्ट्रवादीचे धक्कातंत्र, स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर, 'या' नेत्यांना मिळाली संधी

FAQs :

1. कारवाई कोणावर करण्यात आली?

एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर कारवाई करण्यात आली.

2. कारवाई का करण्यात आली?

अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाच्या आरोपांमुळे महापालिकेने कारवाई केली.

3. किती नगरसेवकांविरोधात तक्रारी असल्याचे सांगितले जात आहे?

सुमारे 22 ते 25 नगरसेवकांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

4. कोणत्या प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत?

अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण आणि दोनपेक्षा जास्त अपत्य अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत.

5. आयुक्त अमोल येडगे यांनी काय माहिती दिली?

संबंधित विभागांचा चौकशी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com