NCP Politics : पुणे महापालिकेत राष्ट्रवादीचे धक्कातंत्र, स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर, 'या' नेत्यांना मिळाली संधी

Dattatray Dhankawade Rakesh Kamthe Approved corporator : पुणे महापालिकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून स्वीकृत नगरसेवकासाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
NCP Dattatray Dhankawade  Rakesh Kamthe Approved corporator
NCP Dattatray Dhankawade Rakesh Kamthe Approved corporator Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आली. भाजपच्या वाट्याला सात स्वीकृतनगरसेवक पद आली आहेत. तर, विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दोन पद आली आहे. भाजपने आपले सात उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकत होती.

राष्ट्रवादीने स्वीकृत नगरसेवक म्हणून दोन जणांची नावे जाहीर करताना अनुभवी आणि युवा याचा समतोल साधला आहे. माझी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी राकेश कामठे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून राष्ट्रवादीने संधी दिली आहे.

दत्तात्रय धनकवडे हे पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. 2014 मध्ये महापौर म्हणून त्यांना पक्षाकडून संधी धेण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव परिसरात नेहमीच वर्चस्व राहिले आहे, मात्र या निवडणुकीत भाजपने येथे आपले नगरसेवक निवडून आणत राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का लावला आहे. त्यामुळे पक्ष संघटनेच्या दृष्टिने या भागातील दत्तात्रय धनकवडे यांना संधी दिल्याने येथील कार्यकर्त्यांना बळ मिळेल, असे सांगितले जात आहे.

NCP Dattatray Dhankawade  Rakesh Kamthe Approved corporator
Pune Mahapalika News : लेले, पुरोहितांसह स्वीकृतसाठी भाजपकडून निष्ठावंतांना संधी : 400 इच्छुकांमधून 7 नावं फायनल; पराभूतांचा पत्ता कट

काँग्रेसकडून सुनील शिंदे

काँग्रेसच्या वाट्याला अवघे एक स्वीकृत नगरसेवकपद येणार होते. पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह अनेक जण याच्यासाठी इच्छुक होते. स्वीकृत नगरसेवकपदाबाबत दिल्लीतून देखील हालचाली केल्या जात असल्याचे वृत्त होते. अखेर येथे कामगार नेते सुनील शिंदे यांना काँग्रेसकडून स्वीकृत नगरसेवकपदाची संधी देण्यात आली आहे.

NCP Dattatray Dhankawade  Rakesh Kamthe Approved corporator
sabapati election : सभापती-उपसभापती निवडीआधीच राजकीय वातावरण तापलं, शिवसेनेचे वर्चस्व; शिंदेंच्या आदेशानुसार नावं अन् कार्यकाळ जाहीर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com