Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election 2024: राज्याच्या महायुती सरकारमध्ये मला रोजगार हमी योजना व फलोत्पादन खात्याचे मंत्रीपद मिळाले. याआधी हेच खाते माझ्याकडे होते, कधी चर्चेत नसलेले हे खाते मी शेतकऱ्यांसाठीच्या योजना सुटसुटीत, मर्यादा वाढवत आणि जाचक अटी हटवून नावारुपाला आणले.
राज्यातील गोरगरिब शेतकऱ्यांसाठी काही करता आले याचे समाधान निश्चितच आहे. आता तुमच्या आशिर्वादाने मला दिल्लीत जनतेची सेवा करण्याची संधी द्या, असं आवाहन महायुतीचे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी गंगापूर येथील मेळाव्यात मतदारांना केलं.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) विकास पुरुष आहेत. गरीबांसाठी कल्याणकारी योजना तयार करून त्या तळागाळापर्यंत पोहचल्याने आपला देश जागतिक पातळीवर पाचव्या क्रमांकावर आला आहे. शिवसेनेच्या (Shivsena) 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे तत्व स्वीकारून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यासह प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा प्रवाहित केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं आश्वासनही भुमरे यांनी दिलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. काँग्रेसला (Congress) 50 ते 60 वर्षात जे जमले नाही ते मोदी यांनी दहा वर्षात करुन दाखवलं आहे. भारताला आता जगात मान आहे. एक-एक मतदान महत्वाचे असून सर्वांनी जागृत राहून काम करा असं आवाहन भुमरेंनी केलं. गोदावरी नदीत लोकं स्नान करतात, पण तुमच्या आमदारांनी गोदावरीच तुमच्या घरी आणली, असे म्हणत भुमरे यांनी आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांचे कौतुक केलं.
रोजगार हमी व फलोत्पादन या खात्याला नावारूपाला आणण्याचे काम करताना विहिरीसाठी जीएसडीए प्रमाणपत्र, लोकसंख्येची अट, अंतराच्या प्रमाणपत्राची अट काढून टाकली. 3 लाखात विहीर होत नाही त्यासाठी मर्यादा वाढवून 4 लाखाची तरतुद केली. आचारसंहिता लवकर लागली नाही तर 50 हजार आणखी वाढवणार होतो, असंही भुमरे यांनी सांगितलं. फळबागेसाठीच्या अंतराची अट काढली, पांदण रस्त्यासाठी एक लाख प्रति किलोमीटरला मिळत होते ते आता तब्बल 24 लाख केले. यामुळे शेतीला पक्का रस्ता तयार होईल, यावर शेतीचा विकास अवलंबून आहे.
शेततळे आणि त्यासाठी लागणारी प्लास्टीकची पन्नी मनरेगात आणली. घरोघरी या खात्याचा फायदा पोहचवण्यात यश आले याचे समाधान आहे. 1800 कोटी खर्च पूर्वी होत होता आता 6 हजार कोटी रुपये खर्च केले जात असल्याचे भूमरे यांनी सांगितले. जिल्ह्याचा आणखी सर्वांगिण विकास करण्याची संधी द्या, असं भूमरे यावेळी म्हणाले. तर संदिपान भुमरे विकासाची दृष्टी असलेले नेते असून त्यांना विजयी करा, असं आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या भाषणात केले.
सरकारने वॉटर ग्रीडच्या माध्यमातून बांधावर पाणी पोहचवले. रोहयो मंत्री संदिपान भूमरे यांनी रोजगार हमी योजना नावारूपाला आणली आहे. 12 जनावरांची अट त्यांनी काढली, पिकांच्या अंतराची तसेच कांदा चाळ संदर्भाती अट काढली. पेव्हर ब्लॉक्स, गाव अंतर्गत रस्ते रोहयोच्या माध्यमातून केले. त्यामुळे विकासावर मत द्यायचे आहे. धनुष्यबाण मनातून जाऊ शकत नाही. भारत देशाचा विचार केल्याशिवाय इतर देशांना निर्णय घेता येत नाही, असेही बंब यावेळी म्हणाले.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.