Lok Sabha Election 2024: इंटरेस्टिंग! माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील 'असा' बजावणार मतदानाचा हक्क

Former President Pratibhatai Patil: निवडणुक आयोगाने प्रथमच 85 पेक्षा जास्त वय असलेल्या आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या मतदारांसाठी घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
Former President Pratibhatai Patil:
Former President Pratibhatai Patil:Sarkarnama
Published on
Updated on

Pune Lok Sabha Election 2024: देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Former President Pratibhatai Patil) या पुणे लोकसभेसाठी (Pune) घरुन मतदान करणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रतिभा पाटील यांचे 89 वय असून, त्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाणे शक्य होणार नसल्यामुळे त्यांना घरून मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील (Kothrud Assembly Constituency) मतदार यादीत पाटील यांचे नाव आहे.

पुणे लोकसभेसाठीचे (Pune Lok Sabha) मतदान 13 मे रोजी पार पडणार आहे. या मतदान दिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 12 मे रोजी निवडणूक अधिकारी प्रतिभाताई पाटील (Pratibhatai Patil) यांच्या घरी जाऊन टपाली मतदानाप्रमाणे त्यांचे मतदान करून घेणार आहेत. निवडणुक आयोगाने प्रथमच 85 पेक्षा जास्त वय असलेल्या आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या मतदारांसाठी घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष बाब म्हणजे या मतदानाचे चित्रीकरण होणार असून, या वेळी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित राहणार आहेत. तर घरून मतदान करण्यासाठी आवश्यक 12 ड फॉर्म (12 D Form) जिल्हाधिकारी कार्यालयात भरला होता. त्यानंतर त्यांना घरून मतदान करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या (Election Commission) घरुन मतदान करण्याच्या सुविधेचा माजी राष्ट्रपतींनी वापर केल्यामुळे इतर वयोवृद्ध मतदारांमध्येदेखील या सुविधेबाबत जागृती होईल असं बोललं जात आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Former President Pratibhatai Patil:
Sharad Pawar: मोठी बातमी! पुण्याला सभेसाठी निघालेल्या शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com