Ambadas Danve, Chandrakant Khaire
Ambadas Danve, Chandrakant KhaireSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar Loksabha : लोकसभेसाठी राऊतांचा हात कुणाच्या डोक्यावर, खैरे की दानवे ?

Shivsena UBT Group News : दोघांच्याही समर्थकांना मुंबईत बोलावून उद्धव ठाकरे यांनी त्यांची मते जाणून घेतली होती.
Published on

Chhatrapati Sambhajinagar Loksabha Constituency : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा थाटात आणि उत्साहात 22 रोजी पार पडला. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लोकसभेची घोषणा होऊ शकते या दृष्टीने राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेना (ठाकरे गट) नाशिक येथे पक्षाचे अधिवेशन आणि मेळावा घेत एकप्रकारे निवडणूक प्रचाराचे रणशिंगच फुंकले.

यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते संजय राऊत यांनी केलेली भाषणं पाहता ही लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगूल वाजवणारीच सभा होती हे स्पष्ट झाले. (Chhatrapati Sambhajinagar Loksabha)

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भातही नुकतीच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक मुंबईत पार पडली. यामध्ये ठाकरे गटाच्यावतीने संजय राऊत या बैठकीला उपस्थित होते. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराच पराभव झाला होता. चार वेळा विजयी झालेल्या चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचा अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभव झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ambadas Danve, Chandrakant Khaire
lok Sabha Election 2024 : लोकसभा उमेदवारीसाठी सगळेच आशेवर, मग पहिला गेम कोणाचा?

आता 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या वतीने कोणाला उमेदवारी दिली जाते? याची उत्सुकता कार्यकर्त्यांसह सर्वांनाच लागली आहे. महाराष्ट्रातील उमेदवार निवडीमध्ये संजय राऊत (Sanjay Raut) यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. संभाजीनगरमधून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारीवर दावा सांगितला आहे.

दोघांच्याही समर्थकांना मुंबईत बोलावून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांची मते जाणून घेतली होती. मी योग्य उमेदवार निवडेन, तुम्ही कामाला लागा, असे आदेश ठाकरेंनी देत दोघांच्या समर्थकांना माघारी धाडले होते. त्यानंतर महिनाभराने संजय राऊत काल संभाजीनगरात येऊन गेले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वैजापूर मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील-चिकटगावकर यांच्या वतीने आयोजित श्रीरामकथेला राऊत यांनी हजेरी लावली.

Ambadas Danve, Chandrakant Khaire
Manoj Jarange Patil Morcha: 'मनोज जरांगे-पाटील तुम्हाला माझा सलाम...'; खासदार इम्तियाज जलील यांचं भावुक ट्विट

यावेळी त्यांनी उपस्थितांमध्ये बसून कथेचा लाभही घेतला. तेव्हा राऊत यांच्याशेजारी खैरे आणि दानवे बसले होते, तर काही अंतरावर भाऊसाहेब पाटील-चिकटगावकर. खैरे-दानवे हे लोकसभेसाठी तर चिकटगावकर वैजापूरमधून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. संभाजीनगरच्या लोकसभा उमेदवारीवरून खैरे-दानवे यांच्यातील वादावर उद्धव ठाकरे, संजय राऊत व अन्य नेते कसा तोडगा काढणार? हे लवकरच स्पष्ट होईल. पण वैजापूरच्या रामकथेत राऊत यांच्या बाजूला बसलेल्या खैरे-दानवे यांच्यापैकी उमेदवारीसाठी ते कोणाच्या डोक्यावर हात ठेवतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com