lok Sabha Election 2024 : लोकसभा उमेदवारीसाठी सगळेच आशेवर, मग पहिला गेम कोणाचा?

Hatkanangle Lok Sabha sabha constituency : काँग्रेसच्या वतीने संभाजीराजे छत्रपती यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी महाविकास आघाडीची आहे.
 Sambhaji Raje, Raju shetti, dhairyasheel mane
Sambhaji Raje, Raju shetti, dhairyasheel mane sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : आगामी लोकसभा निवडणुकीबाबत कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. दोन्हीही मतदारसंघांत जर-तरच्या गोष्टींचा तर्कवितर्क लढवला जात आहे. अशातच महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार लांघ बांधून आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत. इच्छुकांकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा दावा केला जातोय. मात्र, सर्वांना झुलवत ठेवून आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत कोणाचा गेम होणार, याचीच चर्चा जास्त रंगली आहे.

 Sambhaji Raje, Raju shetti, dhairyasheel mane
Maratha Reservation Morcha : एकनाथ शिंदेंनी एकहाती मारले मैदान; तर फडणवीस अन् अजितदादांनी घेतली 'ही' काळजी

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून गोकुळची संचालक डॉ. चेतन नरके (chetan narke), राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. व्ही. पी पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. तिघांनीही आपला दावा मजबूत करण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करीत आहेत. पण, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील (Satej patil) यांनी सरप्राईज चेहरा सांगत नवा ट्विस्ट समोर आणला. अशातच महाविकास आघाडीकडून स्वराज्य संघटनेचे संस्थापक आणि राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा एकदा लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. (kolhapur lok sabha constituency 2024)

एकीकडे ठाकरे गटाकडून शब्द घेऊन गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी गावन् गाव पिंजून काढून लोकसभेची तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे पडद्यामागून काही गोष्ट घडत असून ही जागा काँग्रेसला घेण्यासाठी हालचाली सुरू आहे. काँग्रेसच्या वतीने संभाजीराजे छत्रपती यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी महाविकास आघाडीची आहे. शिवसेना ठाकरे गटाची संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल भूमिका काय असणार हे स्पष्ट नाही. पण हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला किंवा ठाकरे गटांकडून संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी मिळाली, तर नरके, घाटगे आणि पाटील यांचा राजकीय गेम होणार का? अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. शिवाय ठाकरे गटांकडून नरके यांना उमेदवारी घोषित झाल्यास संभाजीराजे छत्रपती यांना केवळ आशा दाखवली का? असे सवालदेखील उपस्थित केला जाऊ शकतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचेच नाव चर्चेत आहे. पण भाजपच्या सर्वेमधून संजय मंडलिक यांच्याबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे. अशावेळी भाजप उमेदवार बदलाच्या हालचाली करत असल्याचे बोलले जात आहे. संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळणार की कोल्हापूर लोकसभेचा महायुतीचा उमेदवार बदलणार, याबद्दल अजूनही साशंकता आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास सध्या विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचे नाव चर्चेत आहे. पण धैर्यशील माने यांच्या बद्दल जनतेमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. कोल्हापूर किंवा हातकलंगले पैकी एक जागा भाजप घेणार असल्याचे सांगितले जाते. अशावेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघ भाजपकडे गेल्यास त्या ठिकाणाहून राहुल आवाडे लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर शौमिका महाडिक यांचेही नाव चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजीतील आमदार प्रकाश आवाडे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच कार्यक्रम धुमधडाक्यात साजरे केले आहेत. जर हा मतदारसंघ भाजपकडे गेला तर खासदार मानेंचे काय होणार? किंवा शिंदे गटाकडे गेल्यास आस लागून राहिलेल्या राहुल आवाडे यांचे काय होणार, अशी ही चर्चा आहे.

हातकणंगले मधून महाविकास आघाडी कडून ही जागा स्वाभिमानी शेतकरी सोडणार असल्याची चर्चा आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना 'एकला चलो'च्या भूमिकेत आहे. इचलकरंजी येथे झालेल्या मेळाव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या घटकपक्षाचा उमेदवार द्यावा. शेट्टींच्या मागे फिरणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. आमदार जयंत पाटील यांचे पुत्र राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत आहेत. जर महाविकास आघाडीने हातकलंगलेत उमेदवार दिल्यास त्याचा फटका शेट्टीना बसणार हे नक्की.

(Edited By Roshan More)

R...

 Sambhaji Raje, Raju shetti, dhairyasheel mane
Maratha Reservation News : मराठा आंदोलनात 'या' तीन महिलांच्या कामगिरीची तुफान चर्चा; खुद्द जरांगेंनी घेतली दखल!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com