

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीसाठीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 57 नगरसेकांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपामध्ये महापौर पदावरून जोरदार चुरस निर्माण झाली आहे. दोन नावे अंतिम झाली असून ती प्रदेशाकडे पाठवण्यात आली आहेत. इकडे स्थानिक पातळीवर सस्पेंस वाढवत भाजपाकडून नवीन नावे पुढे केली जात आहेत. आज महापौर, उपमहापौर पदासाठी भाजपाने तब्बल 16 अर्ज घेतले.
महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्याची उद्या, शुक्रवारी शेवटची तारीख आहे, मात्र भाजपच्या नावांचा सस्पेन्स कायम आहे. भाजपने पक्षाच्या नगरसेविकांना अर्ज घेण्यासाठी समोर केले असून, आज संगीता सांगळे, सुनीता साळुंके यांनी महापौरासाठी चार व उपमहापौरासाठी चार असे एकूण 16 अर्ज घेतले. त्यामुळे शुक्रवारी अर्ज भरल्यानंतरच भाजपचा महापौरपदाचा उमेदवार कोण? हे समोर येणार आहे.
महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान झाले तर 16 जानेवारीला मतमोजणी झाली. त्यात भाजपने 115 पैकी 57 जागा जिंकल्या. त्यामुळे महापौर भाजपचाच होणार हे स्पष्ट आहे. दरम्यान राज्य शासनाने आरक्षण सोडत काढली, त्यात छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारणसाठी निघाले. त्यानुसार चुरस निर्माण झाली आहे. कोण होणार महापौर यावरून खल सुरू असतानाच दुसरीकडे विभागीय आयुक्तांनी महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
त्यासाठी मंगळवारपासून अर्ज वितरण सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमेव नगरसेवक असलेले सतिंदरसिंग (नवीन) ओबेराय यांनी अर्ज घेतला होता. दुसऱ्या दिवशी भाजपने आठ अर्ज घेतले. निवडणुकीतील संभाव्य उमेदवारांनी अर्ज घेणे अपेक्षित असताना संगीता सांगळे, सुनीता साळुंके यांनी गटनेत्याच्या आदेशावरून प्रत्येकी चार अर्ज घेतले. त्यात महापौरासाठी दोघींनी मिळून आठ तर उपमहापौराठी आठ असे 16 अर्ज घतले.
महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे भाजपची महापौर, उपमहापौराची नावे दुपारनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे समर्थक नगरसेवकांपैकी एकाची वर्णी महापौर पदावर लागणार आहे. प्रदेशाकडे पाठवण्यात आलेल्या दोन नावांपैकी एकावर शिक्कामोर्तब होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.