Shivsena Vs BJP : 'आता थांबणे शक्य नाही' : भाजपची वाट न बघता शिवसेना आक्रमक; अर्ज दाखल करायला सुरुवात

Shivsena Vs BJP : छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी महायुतीत युती की स्वतंत्र लढत यावर निर्णय प्रलंबित असून, शिवसेनेने 41 जागांचा प्रस्ताव दिल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
Mahayuti leaders discuss seat-sharing strategy for Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation elections.
Mahayuti leaders discuss seat-sharing strategy for Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation elections.Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena-BJP News : राज्याच्या सत्तेत एकत्र असलेले महायुतीतील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी युती करायची की स्वतंत्र लढायचे याचा निर्णय अजूनही होईना. शिवसेनेने भजापकडे 41 जागांचा अंतिम प्रस्ताव दिला आहे, यावर स्थानिक पातळीवर तडजोड नाही, जी तडजोड करायची ती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेच करतील, असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज दाखल करायला 36 तासच शिल्लक असल्याने आता थांबणे शक्य नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

संभाजीनगर महापालिकेतील युती संदर्भात शिवसेना-भाजपमध्ये अद्यापही एक मत झालेले नाही. भाजपने 48 ते 50 जांगावर तर शिवसेनेने 39 ते 42 जागांचा प्रस्ताव भाजपकडे सोपवल्याची माहिती आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज आणि उद्याचा दिवस आहे. आज सायंकाळी युती संदर्भातील अंतिम घोषणा केली जाऊ शकते. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरणे, कागदपत्रांची तपासणी, जुळवाजुळव या सगळ्या गोष्टी अत्यंत किचकट आहेत. त्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो, त्यामुळे आम्ही आमच्या काही उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे.

युती व्हावी ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. परंतु भाजपकडून अद्यापही प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे युतीचा निर्णय झाला तर ठीक नाही तर आम्ही स्वबळावर लढण्याचीही तयारी केली असल्याचे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत युतीसाठी अनेक बैठका झाल्या आहेत. मात्र त्यातून अंतिम तोडगा निघालेला नाही. आता दोन्ही पक्षांनी एकमेकांकडे अंतिम प्रस्ताव दिले आहेत. त्यावर आता स्थानिक पातळीवर तडजोड शक्य नाही. ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच होऊ शकते, असे सांगत युतीचा निर्णय आता वरिष्ठ नेत्यांवर सोपवण्यात आला आहे.

Mahayuti leaders discuss seat-sharing strategy for Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation elections.
Sambhajinagar Mahapalika : भावी नगरसेवकांच्या खिशाला प्रचारापूर्वीच चाट; 19 पानांचा उमेदवारी अर्ज अचूक भरायला तब्बल 1 लाख रुपये!

भाजपकडूनही स्वबळाची तयारी!

शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांमध्ये 10 ते 12 जागांवर वाद आहे. त्यावर तोडगा निघत नाहीये. त्यामुळे युतीची चर्चा आताच्या घडीला ठप्प आहे. शिवसेनेने जसे आपल्या काही उमेदवारांना आज अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे, तसेच भाजपनेही काही इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. कदाचित ज्या जागांवर एकमत झाले आहे, त्या उमेदवारांना अर्ज दाखल करण्याच्या सूचना दोन्ही पक्षांकडून देण्यात आल्या आहेत. ज्या जांगावर मतभेद आहे, त्या प्रभागातील उमेदवारांना अद्याप वेटींगवरच ठेवण्यात आले आहे.

Mahayuti leaders discuss seat-sharing strategy for Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation elections.
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत धनुष्यबाण, कमळ की मशाल? शिरसाट, सावे, दानवेंमध्ये टक्कर!

राष्ट्रवादीने नाद सोडला...

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीच्या चर्चेमध्ये स्वतःला गुरफटून न घेता स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. तसेच शंभरहून अधिक जागांवर उमेदवार देण्याची घोषणा करत काही उमेदवारांची नावेही जाहीर केली आहेत. युती न झाल्यास अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनीच तसे स्पष्ट केले होते. मात्र ही चर्चा पुढे सरकलीच नाही. आता राष्ट्रवादी स्वबळार लढत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com