Sambhajinagar Mahapalika : भावी नगरसेवकांच्या खिशाला प्रचारापूर्वीच चाट; 19 पानांचा उमेदवारी अर्ज अचूक भरायला तब्बल 1 लाख रुपये!

Sambhajinagar Mahapalika : संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज अचूक भरण्यासाठी इच्छुक नगरसेवकांना वकील व डीटीपी सेंटरकडे एक लाखांपर्यंत शुल्क मोजावे लागत आहे.
Aspiring corporators queue outside lawyers’ offices and private DTP centers in Chhatrapati Sambhajinagar to get municipal election nomination forms accurately filled ahead of filing deadlines.
Aspiring corporators queue outside lawyers’ offices and private DTP centers in Chhatrapati Sambhajinagar to get municipal election nomination forms accurately filled ahead of filing deadlines.Sarkarnama
Published on
Updated on

Chhattrapati Sambhajinagar News : महापालिका निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या जुन्या आणि नव्या अशा सगळ्याच इच्छुकांची सध्या 'लगीन घाई' सुरू आहे. तब्बल 10 वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत आपली एन्ट्री महापालिकेत नगरसेवक म्हणून झाली पाहिजे, यासाठी इच्छुकांचा आटापिटा सुरू आहे. एकीकडे युती-आघाडीचे भिजत घोंगडे कायम असताना दुसरीकडे इच्छुकांनी कागदपत्रांची जमवाजमव करत उमेदवारी अर्ज भरून तयार ठेवण्यास सुरूवात केली आहे. एकेकापक्षाकडे पाचशे ते दीड हजारापर्यंत इच्छुक असल्याने सध्या अर्ज भरण्यासाठी खासगी डीटीपी सेंटर, वकीलांच्या कार्यालयात मोठी गर्दी होऊ लागली आहे.

हा निवडणुकीचा सिझन असल्यामुळे भावी नगरसेवकांनीही 'होऊ द्या खर्च' म्हणत खिसे मोकळे केले आहे. वर्षानुवर्ष केलेल्या मेहनतीवर उमेदवारी अर्ज भरताना झालेली एक छोटीशी चूकही महागात पडू शकते, हे लक्षात घेता उमेदवारांनी आपला अर्ज अचूक भरण्यावर भर दिला आहे. नेमका याचाच फायदा वकील मंडळींकडून घेतला जात आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा अनुभव असणारी वकील मंडळी व इतरांनी चक्क आपापल्या कार्यालयाबाहेर पत्रकं लावून अर्ज भरण्यासाठीचा रेट फिक्स केला आहे.

उमेदवारी दाखल करण्यासाठी 19 पानांचा अर्ज अचूक भरण्यासाठी चक्क 1 लाखापर्यंत शुल्क आकारले जात आहे. अनुभवी वकील किंवा ज्यांनी अनेक निवडणुकीत आमदार, खासदार, नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज भरून दिले आहेत, त्यांच्याकडे भावी नगरसेवकांनी गर्दी केली आहे.

Aspiring corporators queue outside lawyers’ offices and private DTP centers in Chhatrapati Sambhajinagar to get municipal election nomination forms accurately filled ahead of filing deadlines.
AIMIM Ticket Dispute : एमआयएमच्या तिकीट वाटपावरून संभाजीनगरात दोन गट भिडले, किराडपु-यात राडा, पोलिस बंदोबस्त तैनात!

अर्जासोबत जोडावी लागणारी कागदपत्रे, त्यांची पडताळणी याची खात्री झाल्यानंतरच उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. अशावेळी उमेदवारी अर्ज भरून देणाऱ्यांचा भाव वधारला आहे. पुढील दोन दिवसात हे शुल्क दीड लाखापर्यंत जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

Aspiring corporators queue outside lawyers’ offices and private DTP centers in Chhatrapati Sambhajinagar to get municipal election nomination forms accurately filled ahead of filing deadlines.
Aditya Thackeray : जीपवर उभं राहून भाषण, संस्थान गणपतीला साकडे; आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्टाईलने पेटवली मशाल!

एक लाख द्या अर्ज भरून घ्या..

महानगरपालिका निवडणूक अर्ज भरून हवा असल्यास 1 लाख रुपये किंमत मोजावी लागत आहेत. एक लाख द्या आणि आम्ही अर्ज भरून देऊ असे अनेक बोर्ड वकिल्यांच्या घरासमोर लागले आहेत. हा अर्ज किचकट असल्यामुळे इच्छुकही रिस्क घ्यायला तयार नाहीत. त्यासाठी कितीही पैसे मोजण्याची तयारी ते दाखवत आहेत. अर्ज बाद झाल्यानंतर अपील करता येणार नसल्यामुळे वकिलांकडे इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com