Imtiaz Jalil News: इम्तियाज जलील यांचा नवा धमाका; 'रमाई आवास' गैरव्यवहारात थेट भाजप मंत्र्याचेच नाव घेतलं!

Imtiaz Jalil allegation on Atul save: छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.
Imtiaz Jaleel allegation in Ramai Awas scheme
Imtiaz Jaleel allegation in Ramai Awas schemeSarkarnama
Published on
Updated on

Aimim BJP News March 13, 2026: छत्रपती संभाजीनगर महापालिकेत रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत यापूर्वी पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून देणाऱ्या इम्तियाज जलील यांनी दावा केल्याप्रमाणे नवा धमाका केला.

पत्रकार परिषद घेत इम्तियाज जलील यांनी आता या घोटाळ्यात थेट भाजपचे मंत्री अतुल सावे यांचे नाव घेतले आहे. सावे यांच्या आदेशानेच रमाई आवास घोटाळा झाल्याचा नवा खळबळजनक दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे.

महानगरपालिकेत सर्वाधिक 57 नगरसेवक निवडून आणत महापौर पदासह सत्ता मिळवल्यानंतर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एमआयएम आणि सत्ताधारी शिवसेना भाजप पक्षामध्ये खटके उडू लागले आहेत.

शहागंज भागातील अतिक्रमण हटाव पथकाच्या मोहिमेत अडथळा निर्माण करत अतिक्रमण करणाऱ्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल एमआयएमच्या 13 नगरसेवकांनी विरोधात महापालिका प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे.

अतिक्रमण हटाव मोहिमेत बाधा निर्माण केल्याचा ठपका ठेवत महापालिका अधिनियमानुसार आपले नगरसेवक पद रद्द का करण्यात येऊ नये ? अशा नोटीस या नगरसेवकांना बजावण्यात आल्या आहेत. या कारवाईची टांगती तलवार असताना एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी माझ्या एकाही नगरसेवकावर कारवाई झाली तर मी महापालिकेतील अधिकाऱ्यांना सोडणार नाही,त्यांचे अनेक घोटाळे आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहे, असा दावा करत लवकरच आपण मोठा धमाका करणार असल्याचे सांगितले होते.

Imtiaz Jaleel allegation in Ramai Awas scheme
Satara News: शिक्षण व्यवस्था हादरली! दहावीच्या उत्तरपत्रिका चक्क सहावीच्या विद्यार्थिनींनी तपासल्या; व्हिडीओ पाहा

त्यानुसार गुरुवारी इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन रमाई आवास योजनेतील घोटाळा राज्याचे ओबीसी मंत्री भाजप नेते अतुल सावे यांच्या आदेशाने झाल्याचा मोठा दावा केला. कथित घोटाळा करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांना अतुल सावे यांनीच आदेश दिले होते, असा आरोप इम्तियाज यांनी केला.

या घोटाळ्यातील लुटीत माजी नगरसेवकांनी बोगस लाभार्थी घुसवले, गरिबांच्या हक्काच्या पैशावर दरोडा टाकल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी त्यांनी घोटाळ्यात हात धुऊन घेणाऱ्या माजी नगरसेवकांच्या नावांची यादीच वाचून दाखवली. यामध्ये महेंद्र सोनवणे यांनी 700 तर अरुण बोर्डे यांनी 300 प्रकरणे केल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय भाजपचे जालिंदर शेंडगे, वंचितचे अमित भुईगळ व रूपचंद वाघमारे जितेंद्र सोनवणे, राहुल सोनवणे यांनीही बोगस लाभार्थी दाखवून शासनाच्या निधीची लूट केल्याचे इम्तियाज जलील म्हणाले.

Imtiaz Jaleel allegation in Ramai Awas scheme
Pune Flyover: फडणवीसांनी उद्धघाटन केलेल्या 'अजित पवार उड्डाणपुला'च्या कामात मोठी त्रुट? भाजप नगरसेवकाने केला फोटो शेअर

केवळ 70 टक्के रकमेत शहराचे काम करणाऱ्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीसाठी मनपा निविदाद्वारे नियम अटी शर्ती आण्वये निविदा मागवते. पण मंत्र्यांच्या आशीर्वादाने आणि प्रशासनाच्या संगणमताने एका एजन्सीला 90% कमी दराने कंत्राट दिले, असा आरोपही इम्तियाज जलील यांनी केला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

Imtiaz Jaleel allegation in Ramai Awas scheme
Farmer Loan Waiver Scheme: शेतकऱ्यांनो, कर्जमाफीचा लाभ घ्यायचायं, तर तातडीने 'ही' नोंदणी करा!

स्टंटबाजी नको, ठोस पुरावे द्या; सावे यांचे आव्हान

रमाई आवास योजना घोटाळ्यात इम्तियाज जलील यांनी अतुल सावे यांचे नाव घेतल्यानंतर त्यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली. इम्तियाज जलील हे कॉम्प्रोमाइज करणारे नेते आहेत, प्रसिद्धीसाठी बिनबुडाचे आरोप ते करत असतात, त्यांना प्रसिद्धीचा नाद लागला आहे. त्यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.

यापूर्वीही त्यांनी गुटखा आणि दारूविरोधात आंदोलन केले मात्र ती अर्धवट सोडली, त्यांनी नेहमीच कॉम्प्रमाईज केले आहे. केवळ चर्चेत राहण्यासाठी ते ही स्टंटबाजी करत असतात. त्यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत, असे सांगत ठोस पुरावे द्या असे आव्हान सावे यांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com