

Chhatrapati Sambhajinagar : महापालिका निवडणुकीत नगरसेवक होण्यासाठी उमेदवारांनी केलेल्या खोट्या गोष्टी आता चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. महापालिका अधिनियमानुसार तीन अपत्ये, सरकारी कामात हस्तक्षेप, अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा आणि अवैध बांधकाम, अतिक्रमण प्रकरणी महापालिकेतील सत्ताधारी भाजप, शिवसेनेसह एमआयएमच्या 25 नगरसेवकांना प्रशासनाने नोटिसा पाठवल्या आहेत.
आपले म्हणणे मांडण्यासाठी त्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेशही दिले होते. परंतु 26 पैकी निम्म्याहून अधिक म्हणजे 16 नगरसेवक या सुनावणीला गैरहजर राहिल्याचे समोर आले आहे. डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार असताना नगरसेवकांना आपली बाजू मांडायलाही वेळ नाही, अशी परिस्थिती आहे. तर काही नगरसेवकांनी आपल्याला आणखी वेळ द्यावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 115 पैकी 25 नगरसेवकांविरोधात तीन अपत्ये, अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांसह विविध कारणांवरून अपात्रतेच्या तक्रारी दाखल आहेत. याप्रकरणी आयुक्त अमोल येडगे यांच्यासमोर सोमवारी सुनावणीला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी 9 नगरसेवकांना बोलावण्यात आले होते.
मात्र, यापैकी 8 नगरसेवकांनी आरोपांवर म्हणणे मांडण्यासाठी पुढील तारीख मागितली. आयुक्तांनी त्यांना मुदत दिली असून एमआयएमचे नगरसेवक खान अब्दुल मतीन यांनी मात्र त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. शहागंज-चमन येथे अतिक्रमण हटाव कारवाईवेळी आपण उपस्थित नव्हतो, तर आपल्या नावाचे दुसरे नगरसेवक तेथे उपस्थित होते, असा दावा त्यांनी केला.
याची शहानिशा करण्यासाठी आयुक्तांनी कारवाईचा व्हिडिओ तपासण्याचे आदेश दिले. दरम्यान, तक्रारदारांचे पुरावे व कागदपत्रांची तपासणी होणार असून, संबंधित विभागांकडून वस्तुस्थिती अहवालही मागवला जाणार आहे. अपात्रतेसंदर्भात 25 नगरसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक एमआयएमच्या नगरसेवकांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.