Baba Farzan News: 5 कोटींची कॅश, 21 लाखांचं सोनं, 8 लाखांची चांदी, 4 रायफल,2 पिस्तुलं, 500 जिवंत काडतुसे; 'डॉन'च्या घरी पोलिसांनी पहाटेच टाकली 'रेड'

Chhatrapati Sambhajinagar News: एकेकाळी छत्रपती संभाजीनगर शहरात डॉन बाबा फरजान यांची मोठी दहशत होती. त्यांचं गेल्या महिन्यात निधन झालं. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. त्यांच्यावर विविध कलमांखाली अनेक छोटे-मोठ्या स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते.
Chhatrapati Sambhajinagar Police Raid DON Baba Farzan
Chhatrapati Sambhajinagar Police Raid DON Baba Farzan Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी शुक्रवारी (ता.10 जुलै) पहाटे केलेली कारवाई प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. नव्वदच्या दशकात शहरात मोठी दहशत असलेल्या एका डॉनच्या घरीच पोलिसांनी पहाटेच धाड टाकली. या धाडीत पोलिसांच्या हाती लागलेल्या काही गोष्टींनी शहरात खळबळ उडाली आहे.

एकेकाळी छत्रपती संभाजीनगर शहरात डॉन बाबा फरजान यांची मोठी दहशत होती. त्यांचं गेल्या महिन्यात निधन झालं. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. त्यांच्यावर विविध कलमांखाली अनेक छोटे-मोठ्या स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना छावणी पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका घरात मोठ्या प्रमाणावर रोकड आणि शस्त्रसाठा ठेवण्यात आल्याची खबर मिळाली होती. या मिळालेल्या खबरीची माहिती पोलीस आयुक्तांना देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकानं शनिवारी पहाटेच संबंधित घरावर छापा टाकला.

छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत सातव यांनी छापेमारीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, पोलिसांनी डॉन बाबा फरजान याच्या घरी केलेल्या छापेमारीत 5 कोटींची रोकड, 21 लाखांचे सोन्याचे दागिने, 8 लाखांची चांदी, 4 रायफल,2 पिस्तुले, सुमारे 500 जिवंत काडतुसे असा मोठा ऐवज जप्त केला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Police Raid DON Baba Farzan
IPS News: मोठी बातमी: सात आयपीएस अधिकाऱ्यांनी सोडलं तडकाफडकी पद; राजीनाम्यामागं कोणाचा दबाव की वेगळं काही कारण?

तसेच पोलिसांना या कारवाईदरम्यान रोख रक्कम, सहा वेपन, तलवारी, चाकू, गुप्ती असे इतर शस्त्रसाठाही हाती लागला आहे. बाबा फरजान यांच्याविरोधात गुन्हे दाखल असल्यानं पोलिसांनी ही कारवाई करताना सावधगिरी बाळगल्याचंही, पोलिस अधिकारी सातव यांनी सांगितलं.

पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये घातपात घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. संबंधित घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड, शस्त्रासाठा,लाखो रुपयांचे सोनं-चांदी दागिने आणि जिवंत काडतुसे कोठून आणण्यात आली.

Chhatrapati Sambhajinagar Police Raid DON Baba Farzan
IPS News: मोठी बातमी: सात आयपीएस अधिकाऱ्यांनी सोडलं तडकाफडकी पद; राजीनाम्यामागं कोणाचा दबाव की वेगळं काही कारण?

याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. छापेमारीत पोलिसांना हाती लागलेल्या शस्त्रांस्त्रांचा वापर यापूर्वी झाला आहे का, ते येथे साठवण्याचा हेतू काय होता, याबाबतचा सखोल तपास केला जात आहे. ही कारवाई शुक्रवारी (ता.10 जुलै) तारखेला करण्यात आली आहे. त्याचदिवशी पोलिसांनी रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com