PWD recruitment scam : ना जाहिरात, ना भरती प्रक्रिया! बनावट सह्यांद्वारे तब्बल 31 जणांना सरकारी नोकरी, PWD मधील धक्कादायक प्रकास उघडकीस

Chhatrapati Sambhajinagar Recruitment Scam | ना कोणती जाहीरात, ना कोणती अधिकृत भरती प्रक्रिया केवळ स्कॅन केलेल्या बनावट सह्यांचा वापर करून 31 जणांची शासकीय सेवेत नियुक्ती केल्याचा सार्वजनिक बांधकाम विभागातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar PWD Recruitment Scam
Chhatrapati Sambhajinagar PWD Recruitment ScamSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Recruitment Scam : ना कोणती जाहीरात, ना कोणती अधिकृत भरती प्रक्रिया केवळ स्कॅन केलेल्या बनावट सह्यांचा वापर करून 31 जणांची शासकीय सेवेत नियुक्ती केल्याचा सार्वजनिक बांधकाम विभागातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम विभागात हा मोठा गैरप्रकार झाला आहे. मागील दहा वर्षांत वरिष्ठ आणि बडतर्फ कनिष्ठ लिपिकाने मिळून हा घोटाळा केला आहे. कार्यकारी अभियंत्यांच्या बनावट सह्या वापरुन शासकीय शिपाई, चौकीदार आणि सफाई कामगार या पदांवर 31 जणांची नियुक्त केल्याचं आता समोर आलं आहे.

वरिष्ठ लिपिक अंकुश श्रीरंग हिवाळे आणि बडतर्फ कनिष्ठ लिपिक उज्वला अनिल नरवडे या दोघांविरोधात वेदांतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेषराव काशीनाथ चव्हाण यांची या प्रकरणी फिर्याद दिली होती.

Chhatrapati Sambhajinagar PWD Recruitment Scam
Daund Firing : दौंडच्या कला केंद्रात गोळीबार करणारा भाऊ कोणत्या आमदाराचा? पहिल्यांदाच फुटलं नाव

त्यानुसार, सन 2015 ते 2025 या कालावधीत छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना आणि लातूर येथील सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत जवळपास 31 जणांना शिपाई, चौकीदार, सफाई कामगार अशा विविध पदांवर नियुक्त करण्यात आली होती.

धक्कादायक बाब म्हणजे या नियुक्ता करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या स्कॅन केलेल्या तसंच मॉफिंगद्वारे तयार केलेल्या बनावट सह्या वापर केला आणि खोट्या नियुक्तीपत्रांद्वारे या उमेदवारांना शासकीय सेवेत रुजू केलं. याप्रकरणी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचंही समोर आलं आहे.

Chhatrapati Sambhajinagar PWD Recruitment Scam
Shani Shingnapur trust scam case : 'शनैश्वर'च्या विश्वस्तांची धाकधूक वाढली; उद्या तारीख, देवस्थान कार्यालयात 'पिन ड्रॉप साइलेंस'

15 मे 2025 रोजी तत्कालीन कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांच्या आदेशाने एस. बी. बिहारे यांच्या अध्यक्षतेखाली एक 6 सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने मागील 10 वर्षातील सर्व नियुक्त्यांची कागदपत्रे तपासण्यासाठी वरिष्ठ लिपिक हिवाळे याला संबंधित नस्त्या व मूळ फाईल सादर करायला सांगितलं होतं.

मात्र त्यांने ती सादर न करता कार्यालयीन कपाट बंद करून ठेवलं. त्यानंतर कपाटाचा पंचनामा करून त्याचे कुलूप उघडल्यावर भरती प्रक्रियेची नस्ती गायब असल्याचं आढळून आलं. त्यानंतर हा सर्व भरती घोटाळा उघडकीस आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com