Fake birth registration FIR : मोठा घोटाळा, गावची लोकसंख्या 1000 अन् जन्मनोंदी 3500! थेट गुन्हा दाखल!

3500 Fake Birth Records Found in Soygaon Pimpri Antur; FIR Registered : छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यातील मोहळाई ग्रामपंचायतीमधील पिंप्री अंतुर गावातील लोकसंख्येच्या तुलनेत जास्त बोगस जन्म नोंदी आढळल्याने खळबळ उडाली आहे.
Fake birth registration FIR
Fake birth registration FIRSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar fake birth records : राज्यात बांगलादेशी अन् रोहिंग्यांची घुसखोरी, त्यांना मिळत असलेल्या जन्म प्रमाणपत्रावरून, भाजपने हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर तापवला आहे. यातून देशाच्या सीमा सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महाराष्ट्रात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी, यावरून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणेमागे पाठपुरावा सुरू केला आहे.

महाराष्ट्रात अवैधपद्धतीने घुसखोरी करून बांगलादेशी अन् रोहिंग्यांना बनावट जन्म दाखल्यांचा मुद्दा महाराष्ट्रात देखील चांगलाच तापला आहे. आता तर छत्रपती संभाजीनगरमधील एक हजार लोकसंख्येंच्या गावात तब्बल साडेतीन हजार बनावट जन्म नोंदी झाल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत मोहळाई अंतर्गत असलेल्या पिंप्री अंतुर या गावाची लोकसंख्या एक हजारच्या आसपास आहे. पण, या गावात 3,448 बोगस जन्म नोंदणी आढळली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सोयगाव पोलिसात गुन्हा नोंद झाला. या गावासाठी वापरण्यात येणारा युजर आयडी हॅक करून ही नोंदणी केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

गट ग्रामपंचायत कार्यालय मोहळाई अंतर्गत मोहळाई आणि पिंप्री अंतुर या दोन गावांचा समावेश आहे. ग्रामपंचायत कार्यालयामार्फत सरकारच्या सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम (सीआरएस) पोर्टलवरचा वापर करून जन्म-मृत्यूची नोंद करण्यात येते. यात पिंप्री अंतुर या गावातील लॉगिन आयडी आणि युजर आयडी बंद असताना 1 एप्रिल ते 2 ऑगस्ट 2025 या दरम्यान 3,448 जन्म आणि आठ मृत्यूची नोंद झाल्याचे निदर्शनात आले.

Fake birth registration FIR
Ganesh Naik : शिंदे पुत्राचं राजकीय भविष्य धोक्यात? गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रावर ‘वार’; ‘नावासमोर कायमचं माजी खासदार करीन!’

या प्रकरणाची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गंभीर दखल घेतली. जिल्हा आरोग्य अधिकारी यांना चौकशीचा आदेश दिला. चौकशीत गंभीर प्रकार समोर आला. सीआरएस पोर्टलची यंत्रणा हॅक करून, बोगस जन्म नोंदी करण्याचा प्रकार समोर आला. यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात सोयगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

Fake birth registration FIR
Tipu Sultan photo controversy : ‘टिपू’वरून वादाचा वणवा; सपकाळांच्या विधानानं 'पेट्रोल'चं काम केलं, फडणवीसांसह अख्खी भाजप तुटून पडली

छत्रपती संभाजीनगरमधील या प्रकारामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. बनावट जन्म नोंदीचा हा प्रकार, यंत्रणा हॅक करून, कोणी अन् कशासाठी केला, यामागे कोणी स्थानिक आहे की, बाह्य राज्यातील टोळी, याचा तपास होणे गरजेचा आहे. या बनावट नोंदी नेमक्या कोणाच्या आहेत, ही माणसं कोठून आली आहेत, नोंदी झालेली ही माणसं आता नेमकी कोठे आहेत, असे अनेक प्रश्न निर्माण झाली असून, पोलिस या गुन्ह्याचा तपास कशापद्धतीने करणार, याची चर्चा आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील हा मुद्याला राजकीय रंग येण्याची शक्यता आहे. मुंबईतील महापौरांनी घुसखोर बांगलादेशी अन् रोहिंग्यांविरोधात तापसणीची मोहीम सुरू केली आहे. काहींना मुंबई महापालिकेतून जन्म प्रमाणपत्र मिळाल्याने, दोन वैद्यकीय अधिकारी आणि आठ जणांविरोधात फौजदारी कारवाई केल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली. मुंबईतील घुसखोरांविरोधात मोहीम सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमधील हा प्रकार समोर आल्याने, त्यात राजकीय एन्ट्री होण्याची चिन्हं अधिक वाढली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com