

Shivsena UBT-BJP News : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील सत्ता नाट्य बरेच रंगले होते. शिवसेना आणि भाजप या सत्ताधारी पक्षांमध्ये कागदोपत्री युती झाल्यानंतरही दोन्ही बाजूने आपापल्या उमेदवारांना मोकळीक देण्यात आली होती. त्यामुळे अखेर कागदोपत्री झालेली ही युती सत्ता समीकरण जुळवताना तुटलीच.
शिवसेनेने भाजपाला सत्ते बाहेर ठेवण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर भाजपने त्यांना धडा शिकवण्याचा निर्धार करत रणनीती आखली. परंतु अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी 48 तास शिल्लक असतानाही भाजपचे गणित जुळत नव्हते.
अतुल सावे चिंतेत होते आणि अशावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम हे भाजपच्या मदतीला धावून आले. भाजपने मित्रपक्ष शिवसेनेची तर जिरवलीच पण 22 सदस्य असताना त्यांना उपाध्यक्ष पदही मिळू दिले नाही.जिल्हा परिषद निवडणुकीत पडद्यामागे झालेल्या या हालचालीचा खुलासा खुद्द मंत्री अतुल सावे यांनी वैजापूर तालुक्यातील मालगाव येथील एका जाहीर कार्यक्रमात केला.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्या महालगाव येथे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातील अतुल सावे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीत भाजपने कसा डाव फिरवला? याचा उलगडा केला. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडी आधीच्या 48 तास आधी माझं गणित जुळतच नव्हतं. मी मुंबईत बसून चिंतेत होतो. याच वेळी जिल्हाध्यक्ष संजय खंबायते आणि वैजापूरचे नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी यांनी माझी भेट घेऊन राजकीय फिल्डिंग लावल्याचे सांगितले.
त्यानंतर रात्री दीड वाजता मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज केला, आणि जे घडलं ते सगळ्यांच्या समोर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य संजय पाटील निकम यांनी आम्हाला साथ दिली.
आधी टाळ्या वाजवा, असेआवाहन करत मंत्री अतुल सावे यांनी जिल्हा परिषदेतील भाजपच्या शतप्रतिषत सत्तेला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची कशी साथ मिळाली? याचा जाहीर खुलासाच केला.
दरम्यान संजय निकम यांनी शिवसेनेचे नेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दानवे यांनी आमचा सौदा केला, आम्हाला डांबून ठेवले असा खळबळजनक आरोप करत या संपूर्ण प्रकरणात 18 कोटींचा व्यवहार केल्याचा आरोप केला होता.
आता मंत्री अतुल सावे यांनीच संजय निकम यांची भाजपला कशी साथ मिळाली असे, सांगत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला लावल्या. यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.