ZP Election Updates : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपद खुल्या वर्गासाठी! इच्छुक लागले तयारीला

ZP President Reservation For Open category : गेल्या जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजपचे सदस्य अधिक असले तरी काँग्रेस-शिवसेनेने अध्यक्षपदासाठी हातमिळवणी केली होती. भाजपला सर्वाधिक सदस्य असताना विरोधात बसावे लागले.
Chhatrapati Sambhajinagar ZP President Reservation News
Chhatrapati Sambhajinagar ZP Election Updates NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary

1.छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी, सगळ्याच पक्षांकडे इच्छुकांची गर्दी

2.अध्यक्षपदासाठी दावेदारांचे पक्षाच्या नेत्यांकडे लाॅबिंग सुरू

3.महायुती- महाविकास आघाडीकडे डझनभर इच्छूक

सुनील इंगळे

Chhatrapati Sambhajinager News : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. गेल्या वेळी पहिल्या अडीच वर्षात खुल्या प्रवर्गासाठी तर त्यानंतरच्या काळासाठी महिला राखीवसाठी अध्यक्षपद होते. आता कोरोनामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता या तयारीला अधिक वेग आला आहे. संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यंदा खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे

2017 ते 2022 दरम्यान, जिल्हा परिषदेवर (Zilla Parisad) शिवसेना-काँग्रेस आघाडी अशी युती होती. तर सर्वाधिक सदस्य असलेल्या भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले होते. राज्यात गेल्या अडीच तीन वर्षात घडलेल्या घडामोडी, फुटलेले पक्ष या पार्श्वभूमीवर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेसाठी रस्सीखेच होणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या दोन प्रमुख पक्षांमध्ये सत्ता संघर्ष होणार असला तरी अद्यात युती की आघाडी याचा निर्णय झालेला नाही.

अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे प्रत्येक पक्षातील दावेदारांनी आता फिल्डिंग लावायला सुरूवात केली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मध्ये गेल्या वेळेस शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीमुळे सर्वाधिक सदस्य असलेल्या भाजपला विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागली होती. सध्या राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात युती असली, तरीही स्थानिक पातळीवर स्वबळावर निवडणुका लढवण्याचे चित्र आहे. यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे.

Chhatrapati Sambhajinagar ZP President Reservation News
Zilla Parishad Election: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक पुन्हा लांबणीवर? कोर्टात सरकारविरोधात याचिका

दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), चौथ्या क्रमांकावर काँग्रेस आणि पाचव्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असल्याचे एकंदरीत चित्र आहे. जिल्ह्यात 2017 ला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी करून अध्यक्षपद मिळविले होते. त्यामुळे सर्वाधिक 23 सदस्य असलेल्या भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले होते. परंतु, आता दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमुळे जिल्ह्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणात विभाजन झाल्याचे चित्र आहे.

Chhatrapati Sambhajinagar ZP President Reservation News
Chhatrapati Sambhajinagar: प्रभागरचनेवर भाजपचा प्रभाव; शिवसैनिक अस्वस्थ

यात सद्यःस्थितीला शिवसेनेकडे आमदारांची संख्या जास्त असल्याकारणाने त्यांचे वर्चस्व दिसून येते, परंतु गेल्यावेळेसपेक्षा भाजप यावेळेसही 25 ते 27 सदस्यांपर्यंत मजल मारेल, असा पक्षाचा दावा आहे. दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील ताकद पाहता या पक्षाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

यंदा निवडणुका स्वबळावर झाल्या तरीही जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीच्या वेळेस युती किंवा महाविकास आघाडीही होऊ शकते. दरम्यान, जिल्ह्यात 63 गट आणि 126 गणांची निश्चिती करण्यात आली आहे. यात वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन केवळ सिल्लोड तालुक्यात अंभई हा गट, तर डोंगरगाव, केळगाव गणांची वाढ करण्यात आली आहे.

आतापर्यंत अध्यक्षपदाचे आरक्षण

1960 - 1981 सर्वसाधारण

1981 - 1992 प्रशासक

1992 - 1997 खुला प्रवर्ग

1997 - 2002 खुला प्रवर्ग

(1995 मंडल आयोगानंतर)

2002 - 2007 अनुसूचित जाती

2007 - 2012 ओबीसी

2012 - 2017 खुला प्रवर्ग

2017 - 2022 महिला राखीव

2022 - 2025 प्रशासक

जिल्हा परिषद पक्षीय बलाबल (2017 ते 2022)

भाजप - 23

शिवसेना -18

काँग्रेस- 16

राष्ट्रवादी - 3

मनसे - 1

रिपाइं (डेमोक्रेटिक) - 1

FAQ

१: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी?

अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी खुले झाले आहे.

२: इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू झाली ?

अनेक उमेदवारांनी तयारी सुरू केली असून हालचालींना वेग आला आहे.

३: या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष कशामुळे?

खुल्या प्रवर्गामुळे अध्यपदासाठीची स्पर्धा वाढणार आहे.

४: या निवडणुकीत कोणत्या पक्षात सत्तेसाठी रस्सीखेच असेल?

महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये स्पर्धा असेल.

५: निवडणुकीचा निकाल कधी लागेल?

जिल्हा परिषदेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही, जानेवारी २०२६ मध्ये घोषणा होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com