Shiv Sena Case : शिवसेना कोणाची? एकनाथ शिदेंची 'ती' चूक महागात पडणार, कपिल सिब्बलांच्या युक्तिवादाने धडधड वाढली

Kapil Sibal Eknath Shinde Uddhav Thackeray : शिंदे हे गुवाहाटीला गेले. मात्र, तो पर्यंत पक्ष हा ठाकरेंकडेच होता. त्यामुळे शिंदेंनी केलेली नियुक्ती ही पक्षाने केलेली नियुक्ती नव्हती, असा युक्तिवाद अॅड. कपिल सिब्बल यांनी केली.
Eknath Shinde  Uddhav Thackeray
Eknath Shinde Uddhav ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Supreme Court : शिवसेना कुणाची आज पुन्हा सुनावणी पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादामुळे एकनाथ शिंदेंची चिंता वाढणार असल्याची चिंता आहे. शिंदेंनी यांनी नेमलेल्या व्हिपवर सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती चुकीची असून, गोगावले यांची नियुक्ती राजकीय पक्षाने केलेली नव्हती.

शिंदे हे गुवाहाटीला गेले. मात्र, तो पर्यंत पक्ष हा ठाकरेंकडेच होता. त्यामुळे शिंदेंनी केलेली नियुक्ती ही पक्षाने केलेली नियुक्ती नव्हती. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर पक्ष त्यांच्याकडे गेला. त्यामुळे त्यापूर्वी शिंदेंनी केलेली नियुक्ती ही अवैध आहे. गुवाहाटीत बसून व्हीप कोण, हे शिंदे ठरवू शकत नाही, असा दावा सिब्बल यांनी केला. पुढील सुनावणी 25 नोव्हेंबरला होणार आहे.

'ते' पत्र का पाठवले?

अ‍ॅड असीम सरोदे यांनी आजच्या युक्तिवादाबद्दल एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, पक्षांतर्गत वाद होता तर एकनाथ शिंदेंनी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना पत्र पाठवायला हवे होते. मात्र, बंड केल्यानंतर त्यांनी 23 जूनला गुवाहाटीमधून राज्यपालांना पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी आम्हीच शिवसेना पक्ष असल्याचे सांगितले जाऊ शकते का? असा मुद्दाही न्यायालयात उपस्थित करण्यात आला. या संदर्भातील कार्यवाही सभागृहात राहून याबाबतची कार्यवाही करणे गरजेचं असते.

नियुक्ती नियमानुसारच

शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी आणि भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी झालेली नियुक्ती घटनेच्या आणि नियमांच्या अनुसरूनच झाली आहे.कोणीही पक्ष बदलला नव्हता, तर केवळ पक्षांतर्गत गटनेता आणि मुख्य प्रतोद यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई होऊ शकत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.