Ajit Pawar Baramati Sabha : मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार बारामतीत पुन्हा बोलले; "२००४ अन् २०१९ ला संधी होती, पण..."

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राज्यभर सभा घेऊन भूमिका स्पष्ट करणार
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सत्तेत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी प्रथमच बारामतीकरांशी शहरात येऊन संवाद साधला. यावेळी बारामतीकरांनी केलेल्या स्वागताने अजितदादा भारावून गेले. 'फुलांचे गुच्छ देतादेता अनेकांनी हाताचे मुकेही घेतले, यातून तुमचे प्रेम लक्षात येते', असे सांगताना ते भावूक झाले. यावेळी सभेतून कुणीतरी 'दादा आता मुख्यमंत्रीच व्हायचे' असे ओरडले. यावर 'अरे आता कशाला त्या आठवणी काढतोस,' असे म्हणत 'उपमुख्यमंत्री म्हणून मनापासून सेवा करणार' असे पवारांनी स्पष्ट केले. (Latest Political News)

बारामतीकरांशी बोलताना (Ajit Pawar) अजित पवारांनी तालुक्यासह राज्याच्या विकासाचा आढावा घेतला. कधी नव्हे असे झालेल्या स्वागतामुळे ते भावूक झाले. बारामतीतील रस्ते फुलांच्या पाकळ्यांच्या सड्याने खूश झाले असतील. ही गर्दी प्रेमापोटी, उत्स्फूर्तपणे जमा झाली असल्याचे सांगण्यासही अजितदादा विसरले नाहीत. यावेळी गर्दीतून एका कार्यकर्त्याने मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा छेडला. याची दखल घेत पवारांनी २००४ आणि २०१९ चे उदाहरण देत खंतही व्यक्त केली.

Ajit Pawar
Ajit Pawar In Baramati : बारामती लोकसभेतील दोन प्रकल्पांबाबत अजितदादांचे मोठे विधान; म्हणाले, "तिजोरी हातात..."

मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसला २००४ मध्ये मुख्यमंत्रीपदाची संधी होती. त्यावेळी स्वतः काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनीही स्पष्ट केले होते. त्यावेळी वरीष्ठांनी संधी दवडली. यानंतर २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार बनवताना शिवसेनेचे ५६ तर राष्ट्रवादी काँग्रेसेचे ५४ आमदार होते. यामुळे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची चर्चा होणे गरजेची होती. मात्र त्या चर्चे मी नव्हतो. आता त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही. मी उपमुख्यमंत्री म्हणून रात्रंदिवस सेवा करणार आहे."

Ajit Pawar
Ajit Pawar News : आम्ही बैठका घेतल्या तर बिघडले कुठे, मुख्यमंत्र्यांना अडचण नाही ; पण...

राज्यभर सभा घेणार असल्याचेही अजित पवारांनी बारामतीकरांसमोर स्पष्ट केले. ते म्हणाले, सत्तेत सहभागी का झालो, याची माहिती तुम्हाला आहे. ती भूमिका आता राज्यातील जनतेला समजावून सांगावी लागणार आहे. त्यासाठी राज्यभर सभा घ्याव्या लागणार आहेत. मी शाहू-फुले-आंबेडकारांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे. हेच सर्वाना सांगावे लागणार आहे. राज्यातील सर्व घटकांना सरकार आपलेच आहे", याचा विश्वास देत आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, शरद पवारांना उत्तर देण्यासाठीच अजित पवार सभा घेत असल्याची चर्चा आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com