MVA News : महाविकास आघाडीला दे धक्का; लाभार्थी कार्यकर्ते गरजले, मात्र शरद पवारांचे मौन

Political News : महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात शरद पवारांची सभा झाली या सभेत शरद पवार यांनी महायुतीचे उमेदवार संजय बनसोडे यांच्यावर टीका तर सोडाच परंतु त्यांचा उल्लेख सुद्धा आपल्या भाषणात केला नाही.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

युवराज धोतरे

Latur News : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार गटात गेलेल्या आमदार व विशेषतः नऊ मंत्र्यांच्या विरोधात शरद पवारांनी पावर गेम लावून आमदारांना पराभूत करण्याची रणनीती आखल्याची चर्चा अनेक ठिकाणी चर्चिली जात आहे. शनिवारी उदगीरात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात शरद पवारांची सभा झाली या सभेत शरद पवार यांनी महायुतीचे उमेदवार संजय बनसोडे यांच्यावर टीका तर सोडाच परंतु त्यांचा उल्लेख सुद्धा आपल्या भाषणात केला नाही. त्यामुळे जमलेल्या सर्व मतदारात आश्चर्य व्यक्त केले जात असून याची जोरदार चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ उदगीर येथील क्रीडा संकुलावर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली. महायुतीचे उमेदवार राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे हे शरद पवारांची साथ सोडुन अजित पवार गटात गेल्याबद्दल काय टीका करणार? काय बोलणार? याकडे सर्वांच्या नजरा होत्या. या सभेत लाभार्थी मोठमोठ्याने गरजले मात्र शरद पवारांनी महाविकास आघाडीला धक्का देत बनसोडे यांचे पूर्ण भाषणात नाव सुद्धा न काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (MVA News)

उदगीरातील शनिवारची सभा सुरु झाल्यानंतर शरद पवार येण्याआधी पासून अनेक लाभार्थी कार्यकर्त्यांची भाषणे झाले. त्यानंतर माजी मंत्री अमित देशमुख यांचे भाषण झाले त्यांनी बनसोडे यांचा समाचार घेत लातूरचे पार्सल लातूरला पाठवा असे आवाहन केले. करोडो रुपयांच्या योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी अत्यंत पोटतिडकीने बनसोडे यांच्यावर कडाडून टीका करत होते. शरद पवार यांच्या उपस्थितीतही अनेक कार्यकर्त्यांनी बनसोडे यांच्यावर टीका केली. मात्र, शरद पवारांनी बनसोडे यांचे नाव न घेता महाविकास आघाडीला चांगलाच धक्का दिला, अशी चर्चा मतदारसंघात जोरदार रंगली होती.

सुरुवातीपासूनच उदगीर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय बनसोडे ( Sanjay Bansode) यांनी प्रचारात आघाडी घेतल्याची चर्चा होती. मात्र शरद पवारांच्या सभेनंतर काय होईल? शरद पवार (Sharad Pawar) काय बोलणार? बनसोडे यांच्यावर काय टीका करणार? यावरच वातावरण कोणत्या मोडवर जाणार हे सांगता येईल, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत होते. मात्र शरद पवारांचे मौन हे बरेच काही सांगून गेले, अशी चर्चा जाणकाराकडून व्यक्त केली जात आहे.

Sharad Pawar
Assembly Election: राज्यातील 35 जागांवरचा जय-पराजयाचा खेळ ठरविणार सत्ता कुणाची ?

माजी खासदारांची दुटप्पी भूमिका

माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी सध्या काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. प्रवेशाच्या कार्यक्रमात दिलीपराव देशमुख, अमित देशमुख, धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत भाषण करत असताना त्यांनी भाजपमध्ये असताना त्यांचा पराभव करण्यासाठी कोण जबाबदार होते, कोणी त्रास दिला यावर उघडपणे भाष्य केले होते. त्यांना पराभूत करण्यासाठीच मी काँग्रेसमध्ये आलोय हे सुद्धा सांगितले होते.

त्यात सुधाकर भालेराव यांचे नाव घेतले होते. परंतु शनिवारी शरद पवारांच्या सभेत त्यांनी उपस्थिती नोंदवून भालेराव यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे लातूरमध्ये एक भूमिका व उदगीरमध्ये दुसरी भूमिका म्हणजे खासदारांनी दुटप्पी भूमिका घेतल्याची चर्चाही यावेळी अनेक मतदारांनी व्यक्त केली.

Sharad Pawar
Kagal Assembly Election : फोडाफोडीने कागलचं गणित बिघडणार? घाटगे-मुश्रीफ यांच्यात प्रतिष्ठेची लढाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com