Shivsena News : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. जो न्याय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना देशात व आमदार सुनील केदार यांना लावला होता. त्याच न्यायाने माणिकराव कोकाटे यांचेही सदस्यत्व रद्द करावे, असेही दानवे यांनी म्हटले आहे.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. 1995 मध्ये कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. आता नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावली आहे.
या निकालानंतर विरोधक आक्रमक झाले असून कृषी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करून लागले आहेत. अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना उद्देशून 'एक्स'वर एक पोस्ट केली आहे. फसवणुकीच्या प्रकरणात कृषमंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे. आता मंत्रिपदाचा राजीनामा तर घ्याच!
मात्र राहुल गांधी यांना देशात आणि सुनील केदार यांना राज्यात जो न्याय लावला आणि तातडीने त्यांचे सदस्यत्व रद्द केले, आता हाच न्याय कोकाटे यांना लावून हे सरकार न्यायप्रिय असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून द्यावे, असे आवाहन दानवे यांनी केले. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात न्यायलायाने दोषी ठरवून काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.
तर 2019 मध्ये कर्नाटकमधील एका सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे? असे वादग्रस्त विधान केले होते.या प्रकरणात सुरतच्या सत्र न्यायालयाने काँग्रेसचे तत्कालीन खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. अंबादास दानवे यांनी राहुल गांधी आणि सुनील केंदार यांचे सदस्यत्व रद्द करण्यात जी तत्परता केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारने दाखवली होती, तीच आता कोकाटे प्रकरणात दाखवावी, असा टोला लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.