

Nanded Municipal Corporation News: अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर झालेल्या नांदेड-वाघाळा महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत पक्षाने बहुमतासह सत्ता मिळवली. स्वबळावर महापालिका लढवण्याचा खासदार अशोक चव्हाण यांचा निर्णय योग्य ठरला. स्थायी समिती व महिला व बालकल्याण समितीत भाजप शिवसेना युतीच वरचढ ठरली. स्थायी समितीवर वर्चस्व मिळवल्यानंतर नांदेड-वाघाळा महापालिकेत शतप्रतिशत भाजपाची सत्ता स्थापन झाली आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीत नगरसेवक वीरेंद्रसिंग गाडीवाले, तर महापालिकेत पहिल्यांदाच पदार्पण करणाऱ्या सदिच्छा सोनी पाटील यांना महिला व बालकल्याण अध्यक्षपदावर संधी मिळाली. तर उपाध्यक्षपदी निरंजना लांडगे यांची वर्णी लागली.
महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये 16 पैकी 10 जागा तर महिला व बालकल्याण समितीत 11 पैकी सात जागा भाजपा शिवसेना युतीने पटकावल्या. आज मंगळवारी मनपात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती अध्यक्षपदासाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. यामध्ये गाडीवाले तसेच सदिच्छा सोनी पाटील व निरंजना लांडगे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. विरोधकांनी चित्र स्पष्ट असल्यामुळे उमेदवारीच दाखल केली नाही, त्यामुळे या तिघांची बिनविरोध निवड झाली.
नवनिर्वाचित सभापती वीरेंद्रसिंग गाडीवाले हे पहिल्यांदा 1997 मध्ये शिवसेनेकडून नगरसेवक झाले होते. त्यानंतर काही काळ काँग्रेसमध्ये आणि आता भाजपात येत त्यांनी सभापती पटकावले. अशोक चव्हाण यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. यापूर्वी सभागृह नेता म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. तर भाजपकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या सोनाली पाटील या महिला व बालकल्याण समिती सभापती झाल्या. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. कोट्यावधी रुपयांचा बोजा असलेल्या नांदेड-वाघाळा महापालिकेला यातून बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून सक्षम करणारा असल्याचा विश्वास नवनिर्वाचित सभापती गाडीवाले यांनी बोलून दाखवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.