Devendra Fadnavis : संतोष देशमुख हत्येनंतर तापलेल्या बीडमध्ये जाऊन CM फडणवीसांनी दिली 'ही' ग्वाही; धसांचाही केला खास उल्लेख

CM Devendra Fadnavis Beed Speech : मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीनंतर भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धस हे एकाच व्यासपीठावर आल्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. हे दोन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर काय भूमिका मांडतात याची उत्सुकता होती.
Devendra fadanvis, suresh dhas
Devendra fadanvis, suresh dhas Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीड जिल्हा गेल्या दीड-दोन महिन्यांपासून राज्यापासून ते देशपातळीवर चर्चेत आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या झाल्यानं एकच खळबळ उडाली. या हत्येनंतर आरोप-प्रत्यारोपांनी दोन महिन्यांपासून राजकारण तापलं आहे.

याचदरम्यान,धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात येत आहे. त्यातच अजितदादांनी बीडचं पालकमंत्री पद स्विकारल्यानंतर धनंजय मुंडेंना अभय दिल्याची चर्चा होती.आता बीडचा दौरा करतानाच आता मुख्यमंत्री फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सुरेश धसांनी ताकद दिल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी(ता.5) भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या आष्टी मतदारसंघातील विविध विकासकामांचं भूमिपूजन करण्यात आलं. याचवेळी त्यांनी कुंटेफळ येथील साठवण तलावाचे भूमिपूजन करण्यात आलं. मराठवाड्याची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही.जलयुक्त शिवार योजनेने अनेक गावात बदल घडवले. गोदावरीच्या खोऱ्यात 53 टीएमसी पाणी आणायचं आहे, असंही मुख्यमंत्र्‍यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुरेश धस एकदा पाठीमागे लागले की, डोकं खाऊन टाकतात. बीड जिल्ह्यातला दुष्काळ हा भूतकाळ होणार असा नाराही दिला. ज्यावेळेस एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार राज्यात आलं.त्यावेळी सर्वात पहिल्यांदा आम्ही आष्टीच्या योजनेला मंजुरी दिली, असंही फडणवीसांनी आपल्या भाषणात सांगितलं.

Devendra fadanvis, suresh dhas
Beed Crime : बीडमध्ये काय घडलं, कसं घडलं? सगळं CM फडणवीसांना माहितीय, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

फडणवीस यांनी यावेळी 'आधुनिक भगीरथ' असा केला. आष्टीच्या विकासकामांच्या कार्यक्रमात भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री पंकजा मुंडे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र आले.संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गेल्या काही महिन्यांपासून धस आणि मुंडे बंधू-भगिनींमधला संघर्ष टोकाला पोहचला होता.

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीनंतर भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धस हे एकाच व्यासपीठावर आल्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. हे दोन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर काय भूमिका मांडतात याची उत्सुकता होती. या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी डायलॉगबाजीनं करत आपआपली भाषणं गाजवली.

Devendra fadanvis, suresh dhas
NCP Politics : अजितदादांच्या पक्षात राहून विरोधी कारवाया, महिला जिल्हाध्यक्षांचं निलंबन; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

आपलं सरकार हे शेतकरी सर्वसामान्यांच्या मागे उभे आहे.पश्चिम महाराष्ट्रातील मान देशातील दुष्काळ संपवला आहे. संपूर्ण मान देशात आज घराघरात पाणी पोहचलं आहे.असेच चित्र भविष्यात मराठवाड्यात दिसेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. न होणारे काम सहकार्यामुळे पूर्ण झाले, असेच पुढेही होतील.

सरपंच परिषदेनं अनेक मागण्या केल्या आहेत. त्यातील एक मागणी सरपंच देशमुख हत्याकांडातील दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात होती.पण याआधीही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतो, सरपंच संतोष देशमुख हत्येसारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. प्रत्येक दोषीवर कारवाई होणारच, कोणीही असो त्याला सोडणार नाही, असा शब्द पुन्हा एकदा फडणवीसांनी बीडकरांना दिला. तसेच एक नवीन बीड उभा करू, गौरवशाली इतिहास निर्माण करण्यासाठी आपण सर्व उभे राहू,यासाठी मी मुख्यमंत्री म्हणून तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असेन, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com