
Nagpur News, 05 Feb : बीड आणि परभणीत काय घडले, कसे घडले, कोणाचा खून पाडला? हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना अवगत आहे. हिवाळी अधिवेशनात त्यांनी या घटनेवर सविस्तर उत्तर दिले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी दौरा करून काय फायदा असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.
हा सर्व प्रकार एका घटनेकडून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रकार असून आम्ही सर्व उघडकीस आणू असा इशाराही पटोले (Nana Patole) यांनी दिला. बदलापूर प्रकरणात कोर्टानेच ताशेरे ओढसे आहेत. पोलिसांनीची एन्काऊंटर केल्याचा निष्कर्ष काढला आहे. हे फेक एन्काऊंटर कोणाच्या आदेशाने करण्यात आले हे महायुती सरकार लपवत आहे.
परभणीचा विषय असाच दपडण्यात आला. माध्यमांच्या माध्यमातून या घटनेकडे दुर्लक्ष करण्यात सरकार यशस्वी झाले आहे. हे सरकार कमजोर आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची त्यांच्यात हिंमत नाही, असा आरोपही पटोलेंनी केला.
धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे एकटेच गुन्हेगार किंवा भ्रष्टाचारी नाहीत. या सरकारमधील 65 मंत्री तसेच असल्याचा पुनरुच्चार करून पटोले यांनी संपूर्ण मंत्रिमंडळ बराखास्त करण्याची मागणी केली. सोबतच सर्व मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती पुरव्यासह मांडू असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात ओबीसींची (OBC) परिस्थिती वाईट आहे. सातत्याने ओबीसीवर अन्याय केला जात आहे. हे जेव्हा आम्ही सांगत होतो तेव्हा फक्त आरोप केले जात असल्याचे म्हटले जात होते. यापूर्वी छगन भुजबळ यांनीसुद्धा यावर आपली भूमिका मांडली होती. त्यांना मंत्रिमंडळात स्थान नाकरून अपमानित करण्यात आले आहे.
सध्या ओबीसी समाजाला टार्गेट केले जात आहे. क्रिमिलीयरची अट टाकून संविधानिक आयोग नेमला. ओबीसींच्या मुलांसाठी होस्टेल नाही. यूपीएससी विद्यार्थ्यांना नियुक्त्या दिल्या जात नाही. अडवणुकीचे धोरण अवलंबले जात असल्याची बाब विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समोर आली आहे. हा प्रश्न अधिवेशनात मांडून सरकारला जाब विचारू असंही नाना पटोले म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.