Devendra Fadnavis in Beed : सुरेश धसांमुळे CM फडणवीस आज बीडमध्ये; पण धनंजय मुंडे 'त्या' कार्यक्रमाला गैरहजर राहणार, मोठं कारण आलं समोर

Devendra Fadnavis Beed visit : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे चर्चेत आणि वादात असणाऱ्या बीड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडमुळे मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत.
Dhananjay Munde Devendra fadnavis
Dhananjay Munde Devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Beed News, 05 Feb : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे चर्चेत आणि वादात असणाऱ्या बीड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडमुळे मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत.

मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावी, अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनी लावून धरली आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सातत्याने मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत आहेत.

अशातच त्यांनी मंगळवारी मुंडे कृषिमंत्री असताना त्यांनी मोठा घोटाळा केल्याचा आणखी एक आरोप केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनेकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली असली तरी उपमुख्यंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र, राजीनामा न घेण्याचे संकेत दिले आहेत. शिवाय अजितदादा बीडमध्ये आले होते.

Dhananjay Munde Devendra fadnavis
BJP News : सीएम फडणवीसांची 'मास्टर' खेळी; अजितदादा अन् शिंदेंच्या पालकमंत्र्यांसाठी धोक्याची घंटा

त्यावेळी मुंडे त्यांच्यासोबत उपस्थित होते. पण बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंर्द फडणवीस बीड (Beed) दौऱ्यावर असताना मात्र मंत्री धनंजय मुंडे गैरहजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी (ता.05) आष्टी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी बीड जिल्ह्यात येणार आहेत.

Dhananjay Munde Devendra fadnavis
Ravi Shankar Prasad : 'महाकुंभ'मधील चेंगराचेंगरीमागे षडयंत्र? ; रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्यामुळे खळबळ!

मात्र, या कार्यक्रमाला मंत्री मुंडे गैरहजर राहणार आहेत. मुंडेंच्या डोळ्यांचे (मोतीबिंदू) ऑपरेशन असल्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे या आमदार सुरेश धस यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर एकत्र आल्याचं पाहायला मिळणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून धस आणि पंकजा मुंडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू होत्या. त्यानंतर आता हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर आल्यानंतर नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com