Hingoli Loksabha News : काँग्रेसला हवी हिंगोली; त्यासाठी जालन्यावर पाणी सोडण्याची तयारी ?

Congress Political News : ...पण शिवसेना ठाकरे गट हा मतदारसंघ सोडायला तयार होईल का?
Hingoli Loksabha News : काँग्रेसला हवी हिंगोली; त्यासाठी जालन्यावर पाणी सोडण्याची  तयारी ?
Published on
Updated on

Marathwada Political News : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील 8 लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. जागावाटपाची चर्चा अद्याप अंतिम टप्प्यात नसली तरी काही मतदारसंघाची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने सुरुवातीपासूनच दावा सांगितला आहे. अशोक चव्हाण या जागेसाठी आग्रही असून हिंगोलीच्या बदल्यात जालन्याची जागा सोडण्याची काँग्रेसची तयारी असल्याची चर्चा आहे.

हिंगोली मतदारसंघात काँग्रेसचे (Congress) संघटन मजबूत असल्याचा दावा करीत गेल्या वर्षभरापासून काँग्रेसने इथे लोकसभेची तयारी सुरू केली आहे. अशोक चव्हाण यांचे विश्वासू डाॅ. अंकुश देवसरकर यांच्यासाठी हिंगोली मतदारसंघ काँग्रेसला हवा आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेकडे हा मतदारसंघ होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत इथून शिवसेनेच्या तिकीटावर हेमंत पाटील हे निवडून आले होते. परंतु एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेल्या बंडानंतर हेमंत पाटील यांनी शिंदेची साथ दिली. त्यामुळे साहजिकच शिवसेना ठाकरे गटाचा या मतदारसंघावर सर्वप्रथम दावा असणार आहे.

Hingoli Loksabha News : काँग्रेसला हवी हिंगोली; त्यासाठी जालन्यावर पाणी सोडण्याची  तयारी ?
Ashok Chavan News : अशोक चव्हाणांना मतदारसंघातही फिरणे झाले अवघड...

शिवसेनेकडून या मतदारसंघात अनेक इच्छुक आहेत. माजी आमदार नागेश आष्टीकर, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा ही नावे सध्या चर्चेत आहे. ठाकरे गट ही जागा सोडणार नाही, हे स्पष्ट असले तरी अशोक चव्हाण (Ashok Chavan) मात्र हिंगोलीची जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या बदल्यात शिवसेना ठाकरे गटाला जालना मतदारसंघ सोडण्याची काँग्रेसची तयारी असल्याचे बोलले जाते. जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार गेल्या सात टर्मपासून पराभूत होत आला आहे.

1996 ते 98 दरम्यान इथून भाजपचे उत्तमसिंग पवार हे खासदार होते, तर त्यानंतर 99 ते 2019 अशा सलग पाच निवडणुकांमध्ये भाजपचे रावसाहेब दानवे हे विजयी झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघाऐवजी हिंगोलीची जागा लढवून काँग्रेस आपला खासदार निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडी आणि सोबत वंचित येण्याची शक्यता लक्षात घेता विजयाचे गणित जुळू शकते, असा काँग्रेसचा कयास आहे. असे असले तरी शिवसेना ठाकरे गट हा मतदारसंघ सोडायला तयार होईल का? हा खरा प्रश्न आहे. हेमंत पाटील यांनी केलेल्या गद्दारीचा वचपा काढण्यासाठी ठाकरे गट उत्सुक आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवाय त्यांच्याकडे उमेदवारांचीही कमतरता नाही. याउलट जालन्यात शिवसेना ठाकरे गटाकडे पाच वेळा खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवेंच्या विरोधात लढू शकेल असा तुल्यबळ उमेदवार नाही. 2019 मध्ये माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यात वाद झाले होते, तेव्हा खोतकरांनी दंड थोपटले होते. परंतु शिवसेना-भाजप युती असल्यामुळे उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांनी खोतकरांची समजूत काढली होती. ते खोतकरही आता शिंदेंच्या गटात आहे.

परंतु, लोकसभेची जागा ठाकरे गटाला सुटली तर ते स्वगृही परतू शकतात, अशीही चर्चा आहे. असे झाले तर 2019 मध्ये टळलेली दानवे-खोतकर लढत 2024 मध्ये पाहायला मिळू शकते. इकडे काँग्रेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख हेही लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत. ठाकरे गटाने हिंगोली मतदारसंघावरचा दावा कायम ठेवला तर जालन्यातून राजाभाऊ देशमुख किंवा माजी आमदार डाॅ. कल्याण काळे हे दानवेंशी दोन हात करण्याच्या तयारीत आहेत. येत्या काही दिवसांत या मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होईल.

(Edited By Deepak Kulkarni)

Hingoli Loksabha News : काँग्रेसला हवी हिंगोली; त्यासाठी जालन्यावर पाणी सोडण्याची  तयारी ?
Ravindra Chavan : लोकसभेला चव्हाण, तर आमदारकीला डोंबिवलीत कोण? 'या' नावांची जोरदार चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com