Ganpat Gaikwad Firing : महेश गायकवाडांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रूग्णालयानं दिली 'ही' माहिती

Mahesh Gaikwad Health Update : आमदार गायकवाडांनी केलेल्या गोळीबारानंतर महेश गायकावाडांवर ठाण्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
MP Dr. Shrikant Shinde meet Mahesh Gaikwad
MP Dr. Shrikant Shinde meet Mahesh GaikwadSarkarnama

Thane : भाजप आमदार गणपत गायकवाड ( Ganpat Gaikwad ) आणि शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वादानं शुक्रवारी गंभीर रूप घेतलं. आमदार गायकवाडांनी महेश यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. या गोळीबारात महेश यांच्यासह सहकारी राहुल पाटील गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे महेश यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आता महेश यांच्या प्रकृतीबाबात मोठी बातमी समोर आली आहे.

MP Dr. Shrikant Shinde meet Mahesh Gaikwad
Nagar News : विवेक कोल्हेंनी भर बैठकीत अधिकाऱ्यांना झापलं; नेमकं काय घडलं?

महेश गायकवाड ( Mahesh Gaikwad ) यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. महेश यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. महेश यांना लावलेला व्हेंटिलेटर काढण्यात आला असून, ते बोलत असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनानं दिली.

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाडांनी जमिनीच्या वादातून शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाडांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात महेश यांच्यासह राहुल पाटील गंभीर जखमी झाले होते. जखमी गायकवाड आणि पाटील यांना कल्याणमधून शनिवारी रात्रीच ठाण्याच्या ज्युपिटर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MP Dr. Shrikant Shinde meet Mahesh Gaikwad
Loksabha Election 2024 : पराभूत होणाऱ्या जागा भाजप मित्रपक्षांना देणार?

यानंतर डॉक्टरांनी तातडीनं दोघांवर शस्त्रक्रिया करून लागलेल्या गोळ्या काढल्या. यात महेश यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तर, पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांना अतिदक्षता विभागात ठेवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभुराज देसाई, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार शहाजीबापू पाटील यांनी रूग्णालयात भेट देत महेश यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली होती.

MP Dr. Shrikant Shinde meet Mahesh Gaikwad
Ganpat Gaikwad Politics : निमित्त गणपत गायकवाडांचे, निशाणा देवेंद्र फडणवीसांवर; नरेंद्र पवारांचा भाजपला घरचा आहेर

गणपत गायकवाडांकडून अन्नत्याग?

दरम्यान, गोळीबारानंतर गणपत गायकवाडांना पोलिसांनी अटक केली होती. आमदार गायकवाडांना शनिवारी ( 3 फेब्रुवारी ) न्यायालयात हजर करण्यात आलं. तेव्हा न्यायालयानं आमदार गायकवाडांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आमदार गायकावाडांना सुरक्षेच्या कारणास्तव ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. तर, अटकेनंतर आमदार गायकवाड यांनी पोटात अन्नाचा एक कणही घेतला नाही. त्यामुळे गायकवाडांनी अन्नत्याग केल्याचं चर्चा सुरू आहे. पण, अद्याप याला अधिकृतरित्या पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला नाही.

( Edited By : Akshay Sabale )

MP Dr. Shrikant Shinde meet Mahesh Gaikwad
Ganpat Gaikwad Firing : पोलिस ठाण्यातील गोळीबाराचं फुटेज बाहेर कुणी काढलं ? ठाकरेंचा प्रश्न अन् चर्चांना उधाण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com