Parbhani Loksabha News : परभणीत उमेदवारीचा घोळ कायम; महायुतीमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर

Babajani Durani राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी व शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्यातील राजकीय मतभेद उघडपणे समोर येत आहेत.
Babajani Durani, Saeed Khan
Babajani Durani, Saeed Khansarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक नेत्यांनी सर्व स्तरावर जोर लावला आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या प्रमुख पक्षांसह तब्बल 14 पक्षांचा सहभाग असलेल्या महायुतीचे नेते कार्यकर्ता मेळाव्यात एकजुटीचा नारा देत असले तरी त्यांच्यातील मतभेद मिटले नसून चव्हाट्यावर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी व शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्यातील राजकीय मतभेद उघडपणे समोर येत आहेत.

बाबाजानी दुर्राणी यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची चौकशी करण्यात यावी. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पाथरी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांच्या जमिनी व मालमत्तेवर डोळा ठेवून त्यांना त्रास दिला, मारहाण करत दहशत निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सचिव आसेफ खान व शिवसेना जिल्हाप्रमुख मुंजाभाऊ टाकळकर यांनी जिल्हा प्रशासनास एका निवेदनाद्वारे केली आहे.

वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पाथरी शहरात सिमेंट रस्ता नाली व पेपर ब्लॉक यांची होत असेल कामे निकृष्ट दर्जाची असून, संबंधित ठेकेदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बाबाजानी दुर्राणी यांनी केली आहे. तसेच येणाऱ्या अधिवेशनात या संबंधात आवाज उठवणार असल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतील संघर्ष पेटणार असल्याचे चित्र आहे.

Babajani Durani, Saeed Khan
Babajani Durrani: रामनामाची अल्पसंख्याकांना चिंता, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात दुर्राणींचा मोदीविरोधी सूर...

वादाची पार्श्वभूमी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचे जाहीर केले. पाथरी शहरातीलच सईद खान यांनी शिवसेनेत प्रवेश केला व दुर्राणी यांना तगडे आव्हान निर्माण केले. तसेच दुर्राणी यांच्याशी संबंधित मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच स्थानिक भाजप नेत्यांनीही दुर्राणी विरोधात मोहीम उघडली. अधिवेशनात प्रवीण दरेकर यांनी यासंबंधी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. अखेर चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या दुर्राणी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकदाही एकत्र व्यासपीठावर नाहीत...

दुर्राणी व खान महायुतीच्या घटपक्षात सहभागी असल्याने त्यांच्यातील मतभेद मिटतील अशी अपेक्षा असताना तशी कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी महायुतीच्या झालेल्या मेळाव्यात दुर्राणी व खान हे नेते आतापर्यंत एकदाही एकत्रितपणे व्यासपीठावर दिसून आलेले नाहीत. याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By : Umesh Bambare

R

Babajani Durani, Saeed Khan
Babajani Durani With Ajit Pawar: कोंडी होत असल्याने आमदार बाबाजानींनी शरद पवारांची साथ सोडली...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com