Rajni Patil : रजनी पाटील यांच्यावर सोपवली 'या' तीन राज्यांची जबाबदारी

Congress Politics : अनेक राज्यांचे प्रभारी म्हणून केलेल्या कामाचा अनुभव विचारात घेऊन त्यांच्यावर काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीत पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी सोपवली.
Rajni Patil
Rajni PatilSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा खासदार सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विश्‍वासू मानल्या जाणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीतील कायम निमंत्रित सदस्या रजनी पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. लोकसभा निवडणुकीत तीन राज्यांतील पराभवाची कारणे शोधण्याचे काम रजनी पाटील करणार आहेत. तीन राज्यांची जबाबदारी असणाऱ्या एकमेव नेत्या आहेत.

राज्यसभेच्या खासदार रजनी पाटील Rajni Patil या गांधी घराण्याशी निष्ठा व अत्यंत विश्वासू म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे सातत्याने त्यांच्यावर पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी सोपवली आहे. ती जबाबदारी समर्थपणे पेलण्याचे काम केले आहे.

काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल K. C. Venugopal यांनी बुधवारी यादी प्रसिद्ध केली. त्यात रजनी पाटील यांच्याकडे दिल्ली, उत्तराखंड व हिमाचल प्रदेश या तीन राज्याच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी नियुक्ती केली आहे.

राज्यसभेत त्यांनी कायम केंद्र सरकारला धारेवर शेतकरी व जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडले आहेत. अनेक राज्यांचे प्रभारी म्हणून केलेल्या कामाचा अनुभव विचारात घेऊन त्यांच्यावर दिल्ली, उत्तराखंड व हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये पक्षाच्या पराभवाच्या कारणांची कारणमीमांसा करण्याची जबाबदारी दिल्याचे बोलले जाते.

Rajni Patil
Arvind Kejriwal Bail : मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन; न्यायालयात नेमकं काय घडलं?

पाटील म्हणाल्या, आतापर्यंत पक्षाने माझ्यावर दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या मी सक्षमपणे निभावल्या आहेत. परत नव्याने काँग्रेस पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे. तीनही राज्यात सर्वत्र फिरून त्यावर विचार मंथन केले जाईल. या राज्यात काँग्रेसला का पराभवाचा सामना करावा का लागला, याचे उत्तर शोधून ती आम्ही पक्ष नेतृत्वाकडे देणार आहोत. त्याचा आगामी काळात काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून कसा पुढे येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे, असे खासदार रजनी पाटील यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Rajni Patil
Mumbai Metro Scam : यह तो 'ट्रेलर' है! IAS रुबल अग्रवाल यांनी मेट्रो अधिकाऱ्यांना खडसावलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com