EX MLA Mohan Hambarde join NCP News : काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे राष्ट्रवादीत प्रवेश करणार, प्रताप पाटील चिखलीकरांनी डाव साधला!

In a setback to Congress, former MLA Mohan Hambarde is set to join NCP in Nanded : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेऊन त्यांनी पक्ष प्रवेशाची तयारी दाखवली होती. त्यानंतर आता येत्या 28 फेब्रुवारी रोजी हा प्रवेश होत आहे.
Mohan Hambrde-Ashok Chavan-Pratap Chikhlikar News
Mohan Hambrde-Ashok Chavan-Pratap Chikhlikar NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded Politics : नांदेड दक्षिण मतदारसंघात अवघ्या अडीच हजार मतांनी झालेला पराभव जिव्हारी लागलेले काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. येत्या 28 फेब्रुवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये हा प्रवेश सोहळा होणार आहे. मोहन हंबर्डे हे अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना त्यांचे समर्थक म्हणून ओळखले जायचे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यासोबत ते ही भाजपमध्ये जातील असे बोलले जात होते. पण हंबर्डे काँग्रेसशीच एकनिष्ठ राहिले.

पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोहन हंबर्डे यांचा निसटता पराभव झाला. शिवसेनेच्या आनंद तिडके यांनी त्यांचा अवघ्या 2471 मतांनी पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे साईड इफेक्ट सर्वच राजकीय पक्षांमध्ये दिसू लागले आहेत. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदार संघात (Congress) काँग्रेस महाविकास आघाडीच्या वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर विजय मिळवला होता.

निवडणुकीच्या चार महिन्यांनी वसंतराव चव्हाण यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर विधानसभेसोबत झालेल्या नांदेड (Nanded) लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने ही जागा कशीबशी राखली. वसंतराव चव्हाण यांच्या निधनाची सहानुभूती असताना काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांना अवघ्या दोन हजार मतांनी विजय मिळवता आला. विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीचा जिल्ह्यात सुपडा साफ झाला. राज्यातील हे बदलते वारे पाहता विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी नव्या पर्यायाचा शोध सुरू केला होता.

Mohan Hambrde-Ashok Chavan-Pratap Chikhlikar News
Congress Political News : काँग्रेसने विधानसभेला उमेदवारी नाकारली, माजी आमदार सुरेश जेथलिया 'हाता'वर घड्याळ बांधणार!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेऊन त्यांनी पक्ष प्रवेशाची तयारी दाखवली होती. त्यानंतर आता येत्या 28 फेब्रुवारी रोजी हा प्रवेश होत आहे. विधानसभा निवडणुकीत लोहा-कंधार मतदार संघातून उमेदवारीसाठी प्रताप पाटील चिखलीकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पक्षाने त्यांना तातडीने उमेदवारी देत मैदानात उतरवले. चिखलीकर यांनीही या मतदारसंघावरील आपली पकड सिद्ध करत विजय मिळवला.

Mohan Hambrde-Ashok Chavan-Pratap Chikhlikar News
Pratap Patil Chikhlikar On Ashok Chavan : अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक चिखलीकरही मैदानात, म्हणाले स्वबळाची खुमखुमी असेल तर..

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नाराज असलेल्या चिखलीकरांनी आमदारकी मिळवत आपले राजकीय पुनर्वसन करून घेतले. त्यानंतर आता नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण समर्थकांना थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन चिखलीकर नांदेडमध्ये पुन्हा एकदा आपला जम बसू लागले आहेत. माजी आमदार मोहन हंबर्डे यांचा राष्ट्रवादीमधील प्रवेश हा अशोक चव्हाण यांना धक्का मानला जात आहे.

Mohan Hambrde-Ashok Chavan-Pratap Chikhlikar News
Nanded Congress News : विधानसभेला काँग्रेसचा धुव्वा उडताच अशोक चव्हाणांचे मेहुणे खतगावकर पुन्हा नव्या वाटेवर!

हंबर्डे यांना भाजपमध्ये खेचण्याचे प्रयत्न अशोक चव्हाण यांच्याकडून सुरू होते अशी चर्चा आहे मात्र चिखलीकर यांनी त्यावर मात करत मोहन हंबर्डे यांना राष्ट्रवादीत आणण्यात यश मिळवले आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुका पाहता नांदेडमध्ये मोहन हंबर्डे यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला फायदा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 28 फेब्रुवारी रोजी हंबर्डे हे हाती घड्याळ बांधतील, अशी माहिती आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषद घेत दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com