Municipal Corporation : काँग्रेसकडे ओढा कमी, मात्र भाषा स्वबळाची; तर शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपच्या नाराजांवर डोळा!

Maharashtra political dynamics News : काँग्रेसच्या अर्ज विक्रीला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. आठवडाभरात पक्षाकडे 285 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रत्येक प्रभागातून आमच्याकडे दहा ते पंधरा अर्ज असल्याचा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारी काँग्रेस पक्ष काहीसा मागे पडल्याचे चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. काँग्रेसच्या अर्ज विक्रीला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. आठवडाभरात पक्षाकडे 285 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रत्येक प्रभागातून आमच्याकडे दहा ते पंधरा अर्ज असल्याचा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. काँग्रेसचा जिल्ह्यात एकही आमदार, खासदार नाही, तरी महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिला जात आहे. तर पक्षाची खरी ताकद आणि राजकीय परिस्थिती माहित असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी मात्र महाविकास आघाडी झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

काँग्रेस (Congress) पक्षाने महापालिकेसाठी इच्छूकांकडून अर्ज मागवले आहेत. आठ दिवसांत 285 अर्ज दाखल झाले आहेत. प्रत्येक प्रभागातून सरासरी दहा ते पंधरा अर्ज असल्याचा दावा पक्षाने केला. अनेक भागांत आजही काँग्रेसचे वर्चस्व असून, त्याचा दाखला देत स्वबळाची भाषा केली जात असली तरी अनेक जण महाविकास आघाडीस इच्छुक आहेत. आघाडी झाल्यास त्याचा फायदा पक्षाला होईल, असा दावा नेते करत आहेत.

Congress
BJP Politics: वाढती इनकमिंग भाजपची चिंता वाढवणारी; आम्ही फक्त सतरंज्या उचलायच्या का? कार्यकर्त्यांच्या भावना

शिंदेंची शिवसेना पूर्वतयारीत मग्न

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांना फॉर्म वाटप करण्याच्या कामात भाजपने (BJP) आघाडी घेतली. त्यांचाच मित्र पक्ष असलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेत तुलनेने सामसूम दिसत असली तरी पक्ष पूर्वतयारीच्या कामात लागल्याचे पदाधिकारी सांगतात. प्रभाग रचनेनंतरच्या याद्या वाटप, चाचपणी या प्रक्रिया सुरू आहे. पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार प्रदीप जैस्वाल विधिमंडळ अधिवेशनानंतर शहरात परतल्यावर हालचालींना वेग येणार आहे.

Congress
Shivsena UBT Dispute : पुरुषोत्तम बरडे शिवसेनेच्या बैठकीकडे फिरलेच नाहीत; पण खैरे म्हणतात, ‘दासरींसोबतचा वाद मिटला...’

पक्षाच्या शहरातील बैठक आणि मेळावे सुरूच असून त्यातून इच्छुकांची नावेही समोर आली आहेत. जवळपास 90 टक्के नावे पक्षाकडे आली आहेत. असे असले तरी शिवसेनेचे डोळे इतर पक्षांतील खास करून भाजपमधील बंडखोरांकडे लागले आहेत. भाजपकडे इच्छुकांची गर्दी असल्याने अनेक जणांना नाराजीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेला अशा नाराजांना पक्षात घेऊन तिकीट देता येईल, अशी आशा आहे.

प्रत्यक्षात नाव निश्चितीची प्रक्रिया झाल्यावरच हे कळणार असले तरी शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपवर डोळा आहे. मध्यंतरी शहरातील बडे पदाधिकरी भाजपमध्ये प्रवेश करते झाल्याने दुखावलेली शिवसेना आता भाजपवर ऐनवेळी घाव घालेल, असे बोलले जाते.

Congress
NCP News: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा निवडणुकांच्या तोंडावरच नवा आदेश; स्थानिक नेत्यांना मोठा फटका बसणार

एमआयएमचे फॉर्म वाटप सुरू

गेल्यावेळी महानगरपालिकेत विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमने यंदाची निवडणूक ताकदीने लढवण्याची तयारी सुरू केली आहे. यावेळी केवळ मुस्लिमबहुल प्रभागांपुरते न राहता एमआयएम इतर प्रभागांमध्येही उमेदवार उभे करण्याची रणनीती आखत आहेत. दोन शिवसेना आणि भाजप यांच्यात होणाऱ्या मत विभाजनाचा काही मिश्र लोकवस्तीच्या प्रभागांत निश्चित फायदा होईल, असा एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

Congress
Eknath Shinde News : आमदार गायकवाडांनी केला करेक्ट कार्यक्रम; शिंदे गटाचा काँग्रेसला मोठा धक्का

माजी खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारपासून पक्ष फॉर्म वितरण सुरू करणार असून ते 17 तारखेपर्यंत चालेल. त्यानंतर बाकी सगळे निर्णय होतील, असे सांगितले. यंदा चाळणी लावून चांगले उमेदवार देऊन जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची आमची तयारी असल्याचे ते म्हणाले.

Congress
Cash bomb shivsena Minister video : महेंद्र दळवीनंतर शिंदे सेनेच्या मंत्र्यावर कॅशबॉम्ब! चित्रलेखा पाटील यांनी थेट व्हिडिओच आणला समोर... आता काय होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com