Shivsena News : तुळजापूर मतदारसंघावरून वाद पेटणार; जागा भाजपची दावा शिंदे गटाचा

Political News : तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आल्यानंतर शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या विधानावरून येत्या काळात महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde, Ramdas Kadam
Eknath Shinde, Ramdas KadamSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांत सध्या लगीनघाई सुरु आहे. महायुती व महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे निवडणुकीची तयारी जोरात सुरु असताना महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरु झाली आहे. त्यातच तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आल्यानंतर शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या विधानावरून येत्या काळात महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला पाहीजे ही स्व. बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती तशी माझी देखील आहे. म्हणून मी तुळजापूरची जागा ही शिवसेनेला सोडवून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी करणार आहे, असे वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केले आहे. (Shivsena News)

दरम्यान कदमांच्या या दाव्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे आहे. याठिकाणी माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील हे आमदार आहेत. ही जागा आता शिवसेनेकडे (Shivsena) घेण्याच्या हालचाली सुरू आहेत का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचे सांगत तुळजाभवानीच्या चरणी पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार यावे, यासाठी साकडे घातले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात आम्ही १०० जागा लढवू आणि किमान ८५ ते ९० जागा जिंकून आणू असा विश्वास देखील कदम यांनी व्यक्त केला ते तुळजापूर येथे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले असता माध्यमांशी बोलत होते.

Eknath Shinde, Ramdas Kadam
Shivsena Vs Ncp : शिंदे गटाच्या नेत्याचे वादग्रस्त विधान; म्हणाले,'राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बसलो तरी उलट्या होतात...'

धाराशिव जिल्ह्यात चार जागा असून एकीकडे भाजपने तुळजापूरसॊबत आणखी एका जागेची मागणी केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने जिल्ह्यातील चारही विधानसभेच्या जागांवर दावा केला असल्याने येत्या काळात वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde, Ramdas Kadam
Gondiya Assembly Election : गोंदिया जिल्ह्यात विधानसभेसाठी चुरस; मविआ अन् महायुतीची प्रतिष्ठा पणाला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com