Raosaheb Danve Family : विधीमंडळ अधिवेशनात संतोष-संजना बहीण-भावाची चर्चा; रावसाहेब दानवेंनी करून दाखवले!

Raosaheb Danve won by making Sanjana Jadhav an MLA : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घराण्याचे तालुक्यातील वर्चस्व आणि पारंपारिक मतदान संजना जाधव यांच्याकडे वळवण्यातही रावसाहेब दानवे यांना चांगले यश मिळाले.
Raosaheb Danve | Santosh Danve | Sanjana Jadhav
Raosaheb Danve | Santosh Danve | Sanjana JadhavSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : भाजपचे नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणूकीचे मुख्य संयोजक म्हणून पक्षाला यश मिळवून दिले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे या त्रिमुर्तींनी भाजपच्या आमदारांचा आकडा 132 वर नेला.

यात रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे चिरंजीव संतोष दानवे भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा तर कन्या संजना जाधव या कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आल्या. लोकसभेच्या जालना मतदारसंघातील पराभवानंतर दानवे यांच्यासमोर आमदार संतोष दानवे यांना भोकरदनमधून तिसऱ्यांदा निवडून आणण्याचे आव्हान तर होतेच.

Raosaheb Danve | Santosh Danve | Sanjana Jadhav
Raosaheb Danve News : रावसाहेब दानवे म्हणतात, महायुतीत 'ऑल इज वेल'!

पण कन्या संजना जाधव यांना कन्नडमध्ये विपरित परिस्थितीत विधानसभेवर निवडून पाठवणे आणि त्यांना राजकारणात एन्ट्री मिळवून देणे त्याहून कठीण आणि आव्हानात्मक काम होते. (Santosh Danve) पण या दोन्ही मुलांचा मार्ग सुकर करण्यात दानवे यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव कामाला आला. विजयाची हॅट्रिक करणारे संतोष दानवे आणि विधानसभेत पहिले पाऊल ठेवणाऱ्या संजना जाधव या बहीण-भावाच्या विधीमंडळ अधिवेशनात झालेल्या विशेष एन्ट्रीची सर्वत्र चर्चा होती.

Raosaheb Danve | Santosh Danve | Sanjana Jadhav
Bjp News : 'होऊन जाऊ द्या,बॅलेट पेपरवर निवडणुका'; भाजपच्या 'या' नेत्याने थेट विरोधकांना दिले आव्हान

या दोघांना विधीमंडळात एकत्र येताना पाहून छायाचित्रकारांचे कॅमेरे त्यांच्याकडे वळले नाहीतर नवलच. आमदारकीची शपथ ते विश्वासदर्शक ठरावासाठीच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात दानवे बहीण-भावांनी वेगळीच छाप पाडली. संजना जाधव यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश देऊन कन्नड मतदारसंघाची उमेदवारी मिळवून देत रावसाहेब दानवे यांनी माईंड गेम खेळला.

Raosaheb Danve | Santosh Danve | Sanjana Jadhav
Bhokardan Assembly Election : विरोधकांकडे विकासाचे व्हिजनच नाही : संतोष दानवे

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घराण्याचे तालुक्यातील वर्चस्व आणि पारंपारिक मतदान संजना जाधव यांच्याकडे वळवण्यातही रावसाहेब दानवे यांना चांगले यश मिळाले. भाजप आणि नाराजीनंतरही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेवटच्या टप्पात दिलेली साथ संजना जाधव यांना पहिल्याच प्रयत्नात आमदार करण्यात मोलाची ठरली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आणि एकनिष्ठ आमदार उदयसिंह राजपूत, संजना व हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे तिरंगी लढत होईल, अशी अपेक्षा होती.

Raosaheb Danve | Santosh Danve | Sanjana Jadhav
Kannad Assembly Election News : रावसाहेब दानवेंनी मुलीला आमदार करत कन्नडवर पकड मिळवलीच!

पण राजपूत बाजूला पडले आणि संजना-हर्षवर्धन जाधव यांच्यातच मुख्य लढत झाली. यात रावसाहेब दानवे आणि महायुतीच्या एकत्रित प्रयत्नामुळे संजना जाधव यांनी बाजी मारली. रावसाहेब दानवे यांनी आपल्या लेकीला आमदार करण्यासाठी वापरलेले राजकीय कसब वाखाणण्याजोगे होते.

दुसरीकडे संतोष दानवे भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघातून दोन वेळा निवडून आल्यामुळे त्यांची मतदारसंघावर पकड आणि विकासाचे मुद्दे हाताशी असल्याने त्यांना हॅट्रीक साधतांना फार अडचणी आल्या नाहीत. आता पाच वर्ष हे बहीण-भाऊ आपापल्या मतदारसंघात विकास कामे करून मतदारांची मने कशी जिंकतात? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com