Shiv Sena MLA Balaji Kalyankar : शिंदेंचा शिलेदार वाढदिवशीच पडला आजारी; काय असेल कारण? उपचारासाठी तातडीनं मुंबईला हलवलं

Shiv Sena Nanded MLA Balaji Kalyankar Hospitalized in Mumbai for Treatment : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रकृती ढासळल्यानं उपचारासाठी मुंबईत हलवलं.
MLA Balaji Kalyankar
MLA Balaji KalyankarSarkarnama
Published on
Updated on

Balaji Kalyankar hospitalized : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रकृती शनिवारी मध्यरात्री अचानक बिघडल्यामुळे त्यांना तातडीने खासगी वाहनानं मुंबईला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

आज कल्याणकर यांचा वाढदिवस होता. ऐन वाढदिवसाच्या दिवशीच त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे.

आमदार कल्याणकर यांनी काही दिवसापूर्वीच नांदेडच्या (Nanded) अश्विनी हॉस्पिटलमध्ये सलग पाच दिवस उपचार घेतले होते. त्यांना तीव्र ज्वरासह उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्यामुळे उपचारासाठी तातडीने मुंबईच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आमदार बालाजी कल्याणकर यांच्या आज वाढदिवशीच आजारी पडल्याने, त्यांच्या समर्थकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमावरही चिंतेचे सावट आहे.

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shivsena) बालाजी कल्याणकर तर शिवसेना ठाकरे सेना पक्षाकडून संगीता पाटील यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत बालाजी कल्याणकर यांनी निसटता विजय मिळवला आहे. शिंदेंच्या निकटवर्तीय आमदरांपैकी ते एक आहेत. परंतु नांदेडमधील बदलती राजकीय परिस्थितीमुळे आता कल्याणकर हे शिंदेपासून पुरते बाजूला सारले गेले आहेत.

MLA Balaji Kalyankar
Lawrence Bishnoi gang : बिश्नोई गँगच्या 'कॉन्ट्रॅक्ट किलर'च्या अटकेचा थरार; 'स्लिपरसेल' म्हणून कार्यरत...

या विजयानंतर शिवसेना ठाकरे सेना पक्षाच्या उमेदवार संगीता पाटील डक यांच्या घरासमोर जाऊन आमदार बालाजी कल्याणकर यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. डक यांच्या कारवर फटके फोडण्यात आले होते, त्यामुळे कारला आग देखील लागली होती. दरम्यान, कल्याणकर यांच्या गटाने हुल्लडबाजी केल्यानंतर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मुलासह भावावर आणि इतर काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

MLA Balaji Kalyankar
Varsha Gaikwad BMC : आरोग्य विभागाचा निधी जातो कुठे? काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा घणाघात

बालाजी कल्याणकर यांचा नांदेड मतदारसंघात चांगलाच दबदबा आहे. ते नेहमीच चर्चेत असतात. प्रचार सभेला चोरून वीज वापरली होती. तसेच मराठा आरक्षणावरून सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे वाहन देखील फाडले होते. तसेच निकालानंतर कल्याणकर यांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या घरासमोर जाऊन चांगलाच गोंधळ घातला होता. याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झालेला आहे.

मुलासह 20 जणांविरुद्ध गुन्हा

आमदार बालाजी कल्याणकर यांचे पुत्र सुहास कल्याणकर, भाऊ एकनाथ कल्याणकर आणि इतर 15 ते 20 जणांवर गुन्हे दाखल झाले असून, दंगा भडकवने, शस्त्र प्रदर्शन, जीवे मारण्याची धमकी देणे, जमाव बंदीचे उल्लंघन करणे यासह इतर कलमान्वये हे गुन्हे दाखल आहेत.

राजकीय निराशेच्या गर्तेत असल्याची चर्चा

कल्याणकर निवडून आल्यानंतर ते मंत्रिपदाच्या शर्यतीत होते. पण ते होऊ शकले नाहीत. माजी मुख्यमंत्री भाजप खासदार अशोकराव चव्हाण नांदेडमध्ये पूर्ण क्षमतेनं सक्रिय झाले आहेत. नांदेडची सगळी सूत्रे हाती घेतली आहेत. तसेच माजी खासदार तथा विधान परिषदेचे आमदार शिवसेना नेते हेमंत पाटील हेही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्णपणे ॲक्टिव्ह आहेत. या सर्व परिस्थितीत पक्ष आणि स्थानिक पातळीवरही कल्याणकर यांचा दबदबा पूर्वीच्या सरकारसारखा उरला नसल्याने ते गेल्या काही दिवसांपासून निराशेच्या गर्तेत असल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com