Anti Corruption Bureau : पाच लाखाची लाच अन् उपजिल्हाधिकाऱ्यासह लिपीक जाळ्यात!

A deputy collector and clerk have been arrested in Sambhajinagar while accepting a ₹5 lakh bribe. : 27 मेला तक्रारदाराला आरोपी त्रिभुवन याने जिल्हाधिकारी कार्यालया समोरील रोडवर पाच लाखाची लाचेची रक्कम घेऊन बोलावले होते. या ठिकाणी सापळा रचून पथकाने दिलीप त्रिभुवनला अटक केली.
Anti Corruption Raid News Chhatrapati Sambhajinagar
Anti Corruption Raid News Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना पाच लाखांची लाच घेतल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्या कार्यालयातील महसूल सहाय्यकाला देखील ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही कारवाई करण्यात आली. वर्ग दोनची जमिन वर्ग एक मध्ये करण्यासाठी चलन जनरेट करण्यासाठी ही लाच घेण्यात आली.

आरोपी खिरोळकर यांच्या घराची झडती घेण्याची प्रक्रीया रात्री उशीरा पर्यंत सुरु होती. या प्रकरणातील 49 वर्षीय तक्रारदार आणि त्यांचे भागीदार यांनी मौजे तिसगाव येथील 6 एकर 16 गुंठे ही वर्ग दोनची जमीन शासनाची परवानगी घेऊन रजिस्टरी खरेदी खत करुन 2023 मध्ये विकत घेतलेली आहे. (Anti Corruption Bureau) हि जमीन वर्ग दोनची असल्यामुळे ती खरेदी करण्यासाठी शासनास लागणारे चलन जनरेट करुन देण्यासाठी या पुर्वी आरोपींनी 23 लाख रुपये घेतले होते.

या जमिनीच्या नजराण्याचा दुसरा टप्पा पुन्हा शासनाकडे भरावयाचा होता. त्यासाठी लागणारे चलन जनरेट करुन देण्यासाठी आरडीसी विनोद खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दिपक त्रिभुवन यांनी 18 लाखांची मागणी केली होती. (Chhatrapati Sambhajinagar) या प्रकरणी लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत विभागाची संपर्क साधला होता. 26 मेला या तक्रारीची पडताळणी केली असता खिरोळकर यांच्या केबीनमध्ये पाच लाख रुपये पहिले आणि फाईल कंप्लेट झाल्यावर तेरा लाख रुपये देण्याचे ठरले होते.

Anti Corruption Raid News Chhatrapati Sambhajinagar
Anti Corruption Bureau : नगरचे आयुक्त जावळे लाचेच्या जाळ्यात; भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडले

27 मेला तक्रारदाराला आरोपी त्रिभुवन याने जिल्हाधिकारी कार्यालया समोरील रोडवर पाच लाखाची लाचेची रक्कम घेऊन बोलावले होते. या ठिकाणी सापळा रचून पथकाने दिलीप त्रिभुवनला अटक केली. यानंतर स्वतंत्र पथकाने विनोद खिरोळकर यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद गोंडूराव खिरोळकर वय 51 आणि दिपक त्रिभुवन वय 40 यांना अटक करण्यात आली असून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Anti Corruption Raid News Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar Water Issue : शहराशी जिव्हाळा नसलेल्या बाहेरच्या पालकमंत्र्यांनीही पाणी प्रश्नाकडे केले दुर्लक्ष!

खिरोळकर यांच्या अंगझडतीमध्ये आयफोन आणि केबीनमध्ये रोख 75 हजाराची रक्कम आढळून आली आहे. हि कारवाई पोलिस अधिक्षक संदिप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, गोरखनाथ गांगुर्डे, दिलीप साबळे, अमोल धस, केशव दिंडे, चेनसिंग घुसिंगे, राजेंद्र सिनकर, अनवेज शेख,युवराज हिवाळे, घुगरे, काळे, जिवडे, कंदे, डोंगरदिवे, इंगळे,राम गोरे, बनकर आणि नागरगोजे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com