Ravindra Dhangekar : वसंत मोरेंच्या पाठोपाठ आता धंगेकरांनीही घेतला मोठा निर्णय! निवडणुकीच्या रिंगणात आता कोणाची लागणार खरी कसोटी?

Ravindra Dhangekar Decision : वसंत मोरेंच्या पाठोपाठ धंगेकरांनीही मोठा निर्णय घेतला आहे. दोन्ही नेते रिंगणात उतरल्यानंतर आता खरी कसोटी कोणाची लागणार? संपूर्ण अपडेट वाचा.
Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पुण्यामध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदमध्ये महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी पुणे महानगरपालिकेतील सर्व 165 जागांवर उमेदवारांची तयारी करणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठीचे उमेदवारी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.

यासोबतच आगामी महापालिका निवडणुकीमध्ये धंगेकर हे स्वतः निवडणूक रिंगणामध्ये उतरणार नसून आपल्या मुलाला ते मैदानात उतरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केला आहे.यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी देखील आपल्या मुलाला महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे. त्यानंतर आता धंगेकर यांनी देखील मुलाला महापालिकेच्या रिंगणामध्ये उतरवण्याचा निर्णय घेतला असल्याचा समोर आला आहे.

Ravindra Dhangekar
Metro Ticket App Update : गुड न्युज! तिकीट रांगेला कायमचा रामराम; 'या' 14 अ‍ॅप्समुळे मेट्रोचा प्रवास होणार आणखी सोपा, बघा नेमकी सुविधा काय!

रवींद्र धंगेकर म्हणाले, शिवसेनेकडून आज पासून इच्छुक उमेदवारांना पक्ष कार्यालयात फॉर्म द्यायला सुरुवात केली आहे. सर्व १६५ ठिकाणी आमची तयारी आहे. एकनाथ शिंदे यांनी फक्त आदेश द्यायचा बाकी आहे. युती बाबतचा निर्णय मात्र एकनाथ शिंदे आणि इतर पक्षातील वरिष्ठ करणारा आहेत. पक्षाने स्वबळावर सांगितलं तर स्वबळावर अथवा युतीचा निर्णय झाला तर त्या पद्धतीने निवडणूक लढवण्यात येईल.

काही माध्यमांमधून पुण्यामध्ये युती झाली तर शिवसेनेला 30 जागा भाजप देणार असल्याचे सांगितले आहेत. मात्र इतक्या कमी जागांवर आम्ही युती मान्य करणार नाही. मात्र युती मध्ये किती जागा घ्यायच्या याबाबत निर्णय झालेला नाही.

पुणे महापालिका निवडणुकीत पुण्यात पक्षाचा चेहरा कोण? असेल असं विचारलं असता एकनाथ शिंदे पुण्याच्या निवडणुकीत पक्षाचा चेहरा असणार आहेत. तसेच पुणे महापालिकेचे जबाबदारी कोणावर असेल याबाबतचा निर्णय पुढील दोन दिवसात एकनाथ शिंदे घेणार असल्याचे धांगेकर म्हणाले.

Ravindra Dhangekar
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election : शिवसेनेचं 'मिशन संभाजीनगर'! मनपा निवडणुकीसाठी आजपासून अर्जांचे वाटप; कोणाला मिळणार संधी?

दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून पुण्याच्या राजकीय वर्तुळामध्ये कार्यरत असलेल्या अनेक नेत्यांची मुलं आता यंदाच्या महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे समोर आला आहे. आमदाराची मुलगी आणि भाजपच्या राज्य मंत्र्यांचा मुलगा यंदाच्या महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार आहे.याबाबतची अधिकृत घोषणा झाली नसली तरी राजकीय वर्तुळात चर्चा मात्र सुरू आहेत. मात्र दुसरीकडे रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांनी आपल्या मुलांना निवडणुकीत च्या रिंगणात उतरवणार असल्याचे जाहीर केला आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com