Supriya Sule to Fadnavis : देवेंद्रजी, आतापर्यंत किती बॅंकांविरोधात एफआयआर दाखल केला; सुप्रिया सुळेंचा सवाल

Marathwada Mews : औंढा तालुक्यातील जोडपिंपरी येथील शेतकरी भुजंग माणिकराव पोले यांनी पीककर्ज मिळत नसल्याने ता. २० सप्टेंबर रोजी बॅंकेतच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Supriya Sule -Devendra Fadnavis
Supriya Sule -Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Hingoli News : एकीकडे काॅर्पोरेटसची अब्जावधी रुपयांची कर्जे राइट ऑफ करायची आणि जगाच्या पोशिंद्याला शेतीसाठी पैसा देताना ताटकळत उभा करायचे, हा विरोधाभास बरा नाही. औंढा नागनाथ येथील शेतकऱ्याला न्याय मिळणार का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. (Devendraji, FIR filed against how many banks so far; Question by Supriya Sule)

हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील जोडपिंपरी येथील शेतकरी भुजंग माणिकराव पोले यांनी पीककर्ज मिळत नसल्याने ता. २० सप्टेंबर रोजी बॅंकेतच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोले यांचे सिबिल खराब असल्याचे कारण देत बँकेने त्यांना पीककर्ज नाकारले होते. या घटनेसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजमाध्यमावर पोस्ट लिहून सरकारला जाब विचारला आहे.

Supriya Sule -Devendra Fadnavis
Maharashtra Politics : मुंबईत पोचताच शिवसेना आमदार अपात्रतेबाबत नार्वेकरांनी केले मोठे विधान...

सुळे यांनी म्हटले आहे की, ही कहाणी एकट्या भुजंग पोले यांची नाही, तर राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील बहुतेक शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे. पीककर्जात थकीतचे प्रमाण वाढल्याचे कारण देऊन कर्ज मंजुरीचे अधिकार बॅंकांनी आपल्या झोनल कार्यालयांना दिले आहेत. परिणामी कर्ज मंजूर व्हायला अडचणी येतात. अशी कित्येक प्रकरणे झोनल कार्यालयांमध्ये प्रलंबित आहेत. शेतीच्या कामासाठी वेळेत कर्जपुरवठा न झाल्याने शेतकरी नाइलाजाने बिगर बँकिंग संस्था, मायक्रो क्रेडिट इन्स्टिट्यूशनकडून चढ्या दराने कर्ज घेतात. यानंतर ते व्याजाच्या दुष्टचक्रात अडकतात.

शेतकऱ्यांना पीककर्जासाठी सिबिल लागू करणे, बॅंकांची कृषी क्षेत्राबाबतची अनास्था आणि शेतकऱ्यांप्रतिचा उदासीन दृष्टिकोन, यामुळे ही परिस्थिती उद्‌भवते. हे एकंदर पतपुरवठा करणाऱ्या व्यवस्थेचे अपयश आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Supriya Sule -Devendra Fadnavis
Pune Loksabha : जगदीश मुळीकांनाही व्हायचंय खासदार; निवडणुकीचे रणशिंग फुंकले, प्रतीक्षा केवळ पक्षादेशाची

वास्तविक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे २०२३ मध्ये अमरावती येथे बोलताना शेतकऱ्यांना सिबिल मागणाऱ्या बॅंकांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. ही घोषणा केल्यानंतर आजवर किती बॅंकांवर कारवाई करण्यात आली, याची माहिती उपमुख्यमंत्री महोदयांनी जाहीर करणे आवश्यक आहे. किमान भुजंग पोले यांच्याप्रकरणी तरी सरकार संबंधित बॅंकेवर कारवाई करणार आहे का? असा सवालही सुळे यांनी विचारला आहे.

Supriya Sule -Devendra Fadnavis
Tatkare On Supriya Sule : सुप्रिया सुळे भाग्यवान, त्यांना अजितदादांसारखा भाऊ मिळाला; सुनील तटकरेंचे प्रत्युत्तर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com