Maharashtra Politics : मुंबईत पोचताच शिवसेना आमदार अपात्रतेबाबत नार्वेकरांनी केले मोठे विधान...

Shiv Sena MLA Disqualification Case : सर्व नियम आणि कायदेशीर तरतुदींचा योग्यरित्या पालन करूनच मी या प्रकरणावर निर्णय घेणार आहे.
Rahul Narwekar
Rahul NarwekarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर हे वेगाने कामाला लागले आहेत. दिल्लीत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून मुंबईत परतलेल्या नार्वेकर यांनी निर्णय करायला मी कसलीही दिरंगाई करणार नाही, तसेच कुठच्याही प्रकारची घाईही करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. (Rahul Narwekar made a big statement regarding Shiv Sena MLA disqualification)

आमदार अपात्रतेच्या कार्यवाहीवर होणाऱ्या दिरंगाईबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (ता. १८ सप्टेंबर) विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. त्यानंतर ते दिल्लीत महाधिवक्ता ॲड. तुषार मेहता यांना भेटण्याठी गेले हेाते. मेहता आणि इतर कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून नार्वेकर हे मुंबईत परतले आहेत. त्यानंतर त्यांनी आपण शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत खटल्याबाबत कोणत्याही प्रकारची दिरंगाई करणार नाही, तसेच घाईही करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Rahul Narwekar
Vidharbha Congress Leader: विदर्भातील काँग्रेस नेते तिसऱ्यांदा ठरले अपात्र; नियम डावलून निवडणूक लढणे पडले महागात

न्यायालयाने कानपिचक्या दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी येत्या सोमवारी (ता. २५ सप्टेंबर) ठेवली आहे. त्यावेळी नार्वेकर हे दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतील, तसेच दोन्ही गटांची कागदपत्रे एकमेकांना पाहण्यासाठी देण्यात येण्याची शक्यता आहे.

ॲड. नार्वेकर म्हणाले की, आमदार अपात्रता प्रकरणावर निर्णय करायला मी कोणत्याही प्रकारची दिरंगाई करणार नाही. पण, कुठच्या प्रकारची घाईही करणार नाही. सर्व नियम आणि कायदेशीर तरतुदींचा योग्यरित्या पालन करूनच मी या प्रकरणावर निर्णय घेणार आहे.

Rahul Narwekar
India Vs Canada Dispute: भारत-कॅनडा संबंधातील दरी वाढली; हा ठरला कळीचा मुद्दा

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आम्ही तीन महिन्यांची मुदत दिली नव्हती. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाचा अध्यक्षांनी मान राखयला हवा होता. आमदार अपात्रता प्रकरणावर आठवडाभरात सुनावणी घेण्यात यावी, तसेच पुढील दोन आठवड्यांनी होणाऱ्या सुनावणीवेळी हा खटला किती दिवसांत निकाली काढणार, याचे वेळापत्रकही देण्यात यावे, असा आदेश दिला होता.

Rahul Narwekar
Pune Loksabha : जगदीश मुळीकांनाही व्हायचंय खासदार; निवडणुकीचे रणशिंग फुंकले, प्रतीक्षा केवळ पक्षादेशाची

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com