Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांच्या लाडक्या आमदाराचं मोठं वक्तव्य; म्हणाले,'नैतिकतेचा विचार...'

Maharashtra politics updates : बीडचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच मुंडेंच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांच्या लाडक्या आमदाराने मोठे वक्तव्य केले आहे.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेला 24 दिवस पूर्ण झाले असले तरी फरार आरोपीना ताब्यात घेतलेले नाही. या हत्याप्रकरणातील तपासाला आता वेग आला असून सीआयटी व एसआयटी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. त्याअनुषंगाने खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची चौकशी केली जात आहे. तर, दुसरीकडे विरोधकांकडून बीडचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच मुंडेंच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांच्या लाडक्या आमदाराने मोठे वक्तव्य केले आहे.

बीड येथील जिल्हधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात फरार असलेल्या आरोपीना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या मोर्चामध्ये औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेटही घेत मोर्चातील नागरिकांची जनभावना त्यांच्या कानावर घातली होती.

Dhananjay Munde
Santosh Deshmukh Murder Case : घुले, आंधळे अन् सांगळे 'वाँटेड'; पोलिस चप्पा चप्पा छान रही है!

त्यातच भाजपचे औसा येथील आमदार अभिमन्यू पवार हे तुळजापूर येथे नवसपूर्ती यात्रेसाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी वाल्मीक कराड यांच्याशी असलेली धनंजय मुंडेंची (Dhananjay Munde) जवळीक आणि नैतिक जबाबदारी यावर त्यांचे मत विचारले असता आमदार पवार यांनी 'नैतिकतेचा विचार ज्याने त्याने करावा,' असे स्पष्ट शब्दात उत्तर दिले.

Dhananjay Munde
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्याप्रकरण पोहचले दिल्ली दरबारी; खासदार सोनवणेंनी केली 'त्या' दोन पोलिस अधिकाऱ्यांची तक्रार

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही सापडले नाहीत. वाल्मिक कराड सीआयडीकडे शरण आला असला तरी धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या जवळकीमुळे तपास प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावर आमदार अभिमन्यू पवार यांनी नैतिकतेचा विचार ज्याने त्यांनी करावा, असे म्हणत धनंजय मुंडेंना सल्ला दिला. त्यांना मी सांगण्याची गरज काय, याशिवाय कार्यकर्ते काय करतात हे नेत्याला माहित नसते, असेही पवार म्हणाले.

Dhananjay Munde
Ajit Pawar Decision : बीडच्या पालकमंत्रिपदाचा सस्पेन्स संपणार; मुंबईत दाखल होताच अजित पवार घेणार निर्णय

दरम्यान, याप्रकरणी सरकारकडून एसआयटी नेमण्यात आली असून या एसआयटीच्या अहवालानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणी राज्य सरकारकडून काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dhananjay Munde
BJP Leader Claims : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते आमच्याकडे येण्यासाठी नंबर लावून बसलेत; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com